Homeकोंकण - ठाणेरक्षाबंधन:- ३ शुभ मुहूर्त,३ शुभ योग, ४७४ वर्षांनंतर.- दुर्मिळ योगामध्ये साजरी केली...

रक्षाबंधन:- ३ शुभ मुहूर्त,३ शुभ योग, ४७४ वर्षांनंतर.- दुर्मिळ योगामध्ये साजरी केली जाईल राखीपौर्णिमा.

मुंबई, २२ ऑगस्ट:-

२२ ऑगस्ट २०२१ रक्षाबंधन. सहसा हा सण श्रवण नक्षत्रात साजरा केला जातो, पण यावेळी राखी धनिष्ठा नक्षत्रात बांधली जाईल. यावर्षी रक्षाबंधनाला संपूर्ण दिवस भद्रा असणार नाही. यामुळे दिवसभर रक्षाबंधन साजरे केले जाऊ शकते. रविवारी, बृहस्पति कुंभ मध्ये वक्री आहे आणि सोबत चंद्र देखील आहे. या ग्रहांमुळे गजकेसरी योग तयार होत आहे.२०२१ पूर्वी, १५४७ मध्ये धनिष्ठ नक्षत्र आणि सूर्य, मंगळ व बुध यांच्या दुर्मिळ योगामध्ये राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली होती.
रक्षाबंधन २०२१, ३ शुभ मुहूर्त, ३ शुभ योग, ४७४ वर्षांनंतर १ दुर्मिळ योगामध्ये साजरी केली जाईल राखीपौर्णिमा

👉उज्जैनचे ज्योतिषी पं.मनीष शर्मा यांच्यानुसार, या वर्षी रक्षाबंधनाला सूर्य, मंगळ आणि बुध सिंह राशीत राहतील. सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. त्याचा मित्र मंगळही या राशीमध्ये राहील. या दिवशी शुक्र कन्या राशीत असेल. ग्रहांचे हे योग शुभ फळ देणारे आहेत. असा योग ४७४ वर्षांपूर्वी तयार झाला होता.११ ऑगस्ट १५७४ रोजी धनिष्ठा नक्षत्रात रक्षाबंधन साजरे केले गेले होते आणि सूर्य, मंगळ, बुधची स्थिती अशीच होती.त्यावेळी शुक्र बुधच्या मिथुन राशीमध्ये होता, तर या वर्षी शुक्र बुधच्या कन्या राशीमध्ये आहे.रक्षाबंधनाला शोभन योग सकाळी १०.३७ पर्यंत होता. अमृत ​​योग सकाळी ५.४० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत असेल. रविवारी धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे मातंग नावाचा शुभ योगही होता.

👉रक्षाबंधनाचे शुभमुहूर्त:-

सकाळी – 09.01 ते 12.13 पर्यंत

दुपारी – 1.49 ते 3.25 पर्यंत

संध्याकाळी – 06 ते 09 पर्यंत

👉रक्षाबंधनाला रक्षासूत्र बांधण्याची परंपरा:-

नकारात्मकता आणि दुर्भाग्यापासून संरक्षण करण्यासाठी, रक्षासूत्र बांधले जाते. रक्षासूत्र धारण केलेल्या व्यक्तीचे विचार सकारात्मक होतात आणि मन शांत राहते अशी मान्यता आहे. हे रक्षासूत्र बहीण तिच्या भावाच्या मनगटावर बांधते. या दिवशी गुरू आपल्या शिष्याला, पत्नी पतीलाही रक्षासूत्र बांधू शकते.

रक्षासूत्र बांधताना हा मंत्र म्हणावा:-

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः।
तेन त्वां अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल।।

👉अर्थ:-

ज्याप्रमाणे महालक्ष्मीने दैत्यराज बळीला एक धाग्याने बांधले होते, त्याचप्रकारचा धागा मी माझ्या भावाला बांधते. देव माझ्या भावाचे रक्षण करो. हा धागा कधीही तुटू नये आणि तो नेहमी सुरक्षित राहो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.