Homeकोंकण - ठाणेराष्ट्रीय महामार्ग अधिकारी समवेत आजरा शिवसेनेची बैठक. - रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे...

राष्ट्रीय महामार्ग अधिकारी समवेत आजरा शिवसेनेची बैठक. – रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे कधी तोडणार.

आजरा. प्रतिनिधी.२३.

आजरा येथील शिवसेनेच्या वतीने आजरा तहसीलदार कार्यालय येथे वर्ग झालेला आजरा – गडहिंग्लज राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे तोडण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आजरा शिवसेना यांनी दिले होते. या अनुषंगाने याबाबत राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी यांच्यासमवेत आज दी. २३ रोजी आजरा तहसीलदार कार्यालय येथे बैठक व्हावी तसेच मोबाईल टॉवर कंपनीने रस्त्याच्या कडेला खुदाई करून व मातीचा भराव टाकून मलमपट्टी करत रस्ते नादुरुस्त केले आहेत. सदर कंपनीने कायदा धाब्यावर बसून काम केले असल्यामुळे सदर कंपनीवर आजरा पोलिसात एफ.आय.आर नोंद करण्याचे सदर बैठकीत ठरले आहे.
या बैठकीला नायब तहसीलदार श्री कोळी, महामार्ग प्रभारी अधिकारी श्रीमंती बारटक्के, तसेच फडतरे, बांधकाम विभाग आजरा येथील अधिकारी, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सावंत उपप्रमुख संजय पाटील, शिवाजी आडाव, युवा सेनेचे सुधीर सुफल, तसेच शैलेश पाटील, संजय शेनवी, अक्षय कांबळे, अनिल केसरकर, मंदार बिरजे, दत्तात्रय पाटील सह शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.