आजरा. प्रतिनिधी. २२
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा बहिरेवाडी गावतील ऋषिकेश जोंधळे हा जवान पाकिस्तान सीमेवर लढताना जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरापूर्वी धारतीर्थी पडला. भाऊबीजेच्या दिवशीच त्यांचे पार्थिव पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्या बहिणीवर आली. ऐन दिवाळीत घरातील एकुलता एक मुलगा व या बहिणीचा एकुलता एक भाऊ जोंधळे कुटुंबियांनी गमावला. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र गहिवरला होता.
पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा एक छोटासा प्रयन्त करत आहेत.
शहीद जवान ऋषिकेश यांची बहीण कु. कल्याणी रामचंद्र जोंधळे हिच्या आयुष्यात असणारी भावाची पोकळी भरुन काढण्याचा मानस आमदार लांडगे यांनी केला आहे.
यावर्षीचे रक्षाबंधन बहिरेवाडी येथे जोंधळे कुटुंबियासोबत साजरा करण्याचा संकल्प आमदार लांडगे यांनी केला आहे.
पाकिस्तान सैन्याने ऐन दिवाळीत जम्मू काश्मीर येथील सीमेवर दि. १३ नोव्हेंबर २०२० रोजी गोळीबार केला होता. त्याला प्रत्त्यूत्तर देताना ऋषिकेश जोंधळे गंभीर जखमी झाले होते. त्यात वीरमरण आले होते. यापूर्वीही प्रतिक यलगर यांनीही सीमेवर हौतात्म पत्करले होते. बहिरेवाडी गावातील युवाकांनी संपूर्ण महाराष्ट्राला देशाप्रति बलिदान देण्याचा आदर्श घालून दिला आहे. आज रक्षाबंधन निमित्त आमदार महेश लांडगे कोल्हापूर ता. आजरा येथील बहिरेवाडी येथे जोंधळे कुटुंबीयांची भेट घेवून कु. कल्याणी जोंधळे यांच्याकडून राखी बांधून घेतली. व रक्षाबंधन भेट म्हणून मोटरसायकल प्रधान केली
आमदार लांडगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कल्याणीला आपली बहीण मानले. त्याद्वारे अनोखे रक्षाबंधन साजरे होणार असून यामधून सामाजिक आदर्श उभा होईल.