Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध ( बँकेच्या संचालक मंडळात १८ पैकी तब्बल...

आजरा अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध ( बँकेच्या संचालक मंडळात १८ पैकी तब्बल ११ नवीन चेहरे, – अशोकअण्णा चराटी यांचे नेतृत्वाखाली निवड)

आजरा अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध ( बँकेच्या संचालक मंडळात १८ पैकी तब्बल ११ नवीन चेहरे, – अशोकअण्णा चराटी यांचे नेतृत्वाखाली निवड)

आजरा.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये ३५ शाखांसह १८०० कोटी रूपयांचा व्यवसाय करणाऱ्या आजरा अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध करण्यात आण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांना यश आले आहे. १८ जणांच्या या संचालक मंडळात यंदा तब्बल ११ नव्या चेहऱ्यांना संधी देणेत आली आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहीले व त्यांनी निवडणूक बिनविरोध झालेचे जाहीर केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव (निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर), प्रेम राठोड (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था करवीर) सुजय येजरे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था आजरा) उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नवनिर्वाचीत संचालक यांची अधिकृतरित्या नांवे घोषित केली त्यामध्ये अशोक काशिनाथ चराटी, जयवंत यशवंत खराडे, श्रीमती शैला रामचंद्र टोपले, विजयकुमार लक्ष्मण पाटील, श्रीमती संध्याताई प्रकाश वाटवे, सौ. कुंदा सुरेश डांग, विनय भालचंद्र सबनीस, अशोक देवगोंडा पाटील, सागर रमेश कुरुणकर, सिद्धेश विलास नाईक, संजय विष्णू चव्हाण, श्री. आनंदा वासुदेव फडके, बसवराज विश्वनाथ महाळंक, ऋषिकेश दीपक सातोसकर, किशोर काशिनाथ भुसारी, किरण आप्पासाहेब पाटील, कान्होबा शंकर माळवे, सुनील माधवराव देशपांडे हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

स्व. काशिनाथ (अण्णा) चराटी व स्व. माधवराव (भाऊ) देशपांडे यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने स्थापना केलेल्या बँकेने मल्टी स्टेट दर्जा प्राप्त केला असून सहकारातील अग्रगण्य बँक म्हणून आजरा अर्बन बँकेचा नावलौकिक आहे. हजारो सभासदांच्या विश्वासाच्या पाठबळावर आम्ही दुसऱ्यांदा ही निवडणूक बिनविरोध करू शकलो याचे समाधान आहे. सभासदांना आणखी चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. तसेच बँक लवकरच २००० कोटींचा व्यवसाय पुर्ण करणेचे ध्येय असलेचे उदगार अण्णा – भाऊ संस्था समुह प्रमुख अशोक (अण्णा) चराटी यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. यावेळी नवनिर्वाचीत संचालक मंडळ यांचा सत्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर व प्रशासन व बोर्ड विभाग प्रमुख नितीन बेल्लदसो यांनी प्रशासनाच्या वतीने केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.