Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा तहसीलदार - मातोश्री पानंद रस्त्याच्या उद्घाटनाला शेताच्या बांधावर.- मडिलगेत - नऊ...

आजरा तहसीलदार – मातोश्री पानंद रस्त्याच्या उद्घाटनाला शेताच्या बांधावर.- मडिलगेत – नऊ पानंद रस्त्यांचा शुभारंभ

आजरा तहसीलदार – मातोश्री पानंद रस्त्याच्या उद्घाटनाला शेताच्या बांधावर.- मडिलगेत – नऊ पानंद रस्त्यांचा शुभारंभ

आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील मातोश्री पानंद रस्त्याच्या मडिलगेत तहसीलदार समीर माने यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच बापू निऊगरे होते.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. आपला सातबारा महिन्यातून एकदा नव्याने काढून तपासावा, आपल्या शेताची मोजणी प्रत्येक शेतकऱ्याने करुन घ्यावी.
पानंद रस्त्यातून आपल्या शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. अनेक गावांमध्ये पानंद रस्त्याबाबत शेतकऱ्यांच्या मध्ये अडचणी निर्माण झाले आहेत. अनेक शेतकरी पानंद रस्त्यासाठी जागा देणे हे बंधनकारक, व विरोध करणे हे कायद्याच्या विरोधात असताना देखील आपल्या शेताची जागा देण्यास तयार नाहीत. परंतु आपल्या गावात सर्व शेतकऱ्यांच्या सहमतीने आनंद रस्ते होत आहेत ही तालुक्यात व जिल्ह्यात बोध घेण्याची गरज आहे.

आजरा तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक शेतकऱ्याने असेच सहकार्य करून आपला व आपल्या शेताकडे जाण्याचा रस्त्याचा मातोश्री आनंद रस्ता करून घेऊन आपला विकास करून घ्यावा. असे तहसीलदार समीर माने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून सरपंच श्री निऊगरे म्हणाले आपण सर्वांनी हाती घेतलेले पानंद रस्ते हे जिल्ह्यात आदर्श ठरतील आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होत आहे. सर्व आनंद रस्त्याच्या मार्गात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी सहमती दिल्यामुळे हे आनंद रस्ते होत आहेत. परंतु सर्वच पानंद रस्ते हे करण्यासाठी शासनाची सहमती आहे. यामुळे आपल्या गावात कोणाकडून अडवणूक झाली नाही. व कोणाकडून शासन अधिकृत नियमाचे उल्लंघन झालेले नाही. याबाबत विशेष कौतुक वाटते. चालू वर्षात गावातील सर्व पानंदरस्ते पूर्ण होतील. असे बोलताना सरपंच श्री. निऊगरे म्हणाले
माजी सभापती भिकाजी गुरव म्हणाले शेत शिवारातील पानंद या तालुक्यातील आदर्श पानंद करण्याचा मानस शेतकऱ्यांना वाट आणि पाट जर व्यवस्थित झाल्या तर शेतकरी आपल्या शेतात लवकरच पोहचेल व वेळेत घरी येईल.. शरीरातील रक्तवाहिनी प्रमाणे शेतातील रस्ते जिवंत राहातील असे श्री गुरव म्हणाले लोकमान्य समुहाचे अध्यक्ष जर्नाधन निऊगरे म्हणाले पानंद रस्ते व्यवस्थित करुया सद्यस्थितीत पानंद रस्ते नसल्यामुळे शेती पडीक होत चालली आहे. अनेक शेतकरी रस्ते नसल्यामुळे शेती करत नाहीत. या जुन्या रस्त्यातून शेतावरती जाण्यास येण्यास इतका वेळ लागतो. यामध्ये अर्धा दिवस जातो. आज शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे रस्ते होत आहेत. हे कौतुकास्पद आहे असे श्री निऊगरे म्हणाले.
या मातोश्री पानंद रस्त्याच्या शुभारंभ नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, के. व्ही. येसणे, दीपक देसाई, उपसरपंच पांडुरंग जाधव, इजि. अनिकेत कवळेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विश्वजीत मुंज, निवृत्ती पाटील, आनंदा घंट्टे, आनंद घाटगे, बाळासाहेब पाटील, शिवाजी कडगावकर, जोतिबा जाधव , ज्योतिबा शिंदे, गंगाराम वांगणेकर, प्रकाश डोंगरे, प्रकाश कडगावकर, युवराज येसणे, आजी-माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सौ मनीषा काणेकर यांनी केले तर तलाठी सौ. कांबळे यांनी आभार मानले.

चौकट.

मातोश्री पानंद रस्ते शुभारंभ कार्यक्रम हा गावाच्या शेताच्या मार्गावर करण्यात आला. या शेताच्या मार्गावरील शेतकरी यांनी या पानांद रस्त्याला जागा दिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचा तहसीलदार श्री माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापूर्वी या गावांमध्ये रिंग रोड, एक पानंद रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला असल्याचे मत तहसीलदार यांनी व्यक्त केले. उर्वरित नऊ पानंदर असते देखील चांगल्या पद्धतीने होऊन जिल्ह्यात आपले गाव आदर्श होईल. अशी भावना व्यक्त करत. सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.