🛑कु. शामल देसाई.
हिची. – भारतीय सैन दलात.-
( सी. आय. एस. एफ ) मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल.- भव्य सत्कार सोहळा.
🛑कानोली येथे व्यायामशाळा इमारत भूमिपूजन सोहळा संप्पन्न.
🛑कु. शामल देसाई.
हिची. – भारतीय सैन दलात.-
( सी. आय. एस. एफ ) मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल.- भव्य सत्कार सोहळा.
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील कु. शामल काकासाहेब देसाई. हिची भारतीय सैन दलात ( सी. आय. एस. एफ ) मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल देसाई परिवार व मडिलगे ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मडिलगे गावच्या बसस्थानका पासून गावातील महिलांच्या वतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांचे लेझीम पथक, ढोल ताशांच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक काढत स्वागत मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे ही ट्रेनिंग पूर्ण करून प्रथमच मूळ गावी आगमन झाले होते. या निमित्ताने ग्रामस्थ मडिलगे व हितचिंतक यांच्या वतीने स्वागत समारंभात आई शोभा काकासाहेब देसाई, वडील काकासाहेब देसाई सर्व देसाई परिवार ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सैनिक संघटना, गावातील विविध संस्थेचे चेअरमन व्हा चेअरमन. पदाधिकारी विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी हितचिंतक मडिलगे यांनी या स्वागत समारंभ त उपस्थित राहून कु. शामल हिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

🛑कानोली येथे व्यायामशाळा इमारत भूमिपूजन सोहळा संप्पन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

कानोली (ता. आजरा ) येथे जिल्हा नियोजन मंडळ यांचे कडून ना. प्रकाश आबिटकर यांचे माध्यमातून जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्फत नवीन व्यायाम शाळा बांधकाम कामी निधी मंजूर झाला असून त्या कामाचा शुभारंभ प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्तानी लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमा पाटील होत्या, स्वागत व प्रास्तविक सुभाष पाटील यांनी केले, यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय पाटील, आजरा शहर प्रमुख विजय थोरवत, शिरसंगी सरपंच संदीप चौगुले, तसेच संजय गांधी निराधार समितीचे सदस्य संतोष चौगुले या मान्यवर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला,यावेळी, बोलताना संजय पाटील म्हणाले, या मतदार संघात आम. शिवाजीराव पाटील आणि ना. आबिटकर यांचे माध्यमातून विकासकामे चालू असून, या दोन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी काम करावे, यापुढेही गावागावात विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, कानोलीतील प्रलंबीत विकास कामासाठी आम्ही निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. यावेळी संदीप चौगुले, संतोष चौगुले, सौ. सुषमा पाटील शिवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपसरपंच चंद्रकांत पाटील, सदस्य, अनिल पाटील, सुधीरकुमार पाटील, स्वप्निल आर्दळकर सौ. आरती देसाई, सारिका भोसले, दिपाली सुतार सौ. शुभांगी पाटील,यांच्यासह तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीपती देसाई, पोलीस पाटील अनिल मुरुकटे, बाजीराव पाटील, दिनकर पाटील बाळासाहेब सुतार, चंद्रकांत आ.पाटील, पी. एम. आपगे, रमेश भोगण, शंकर पाटील, पंडितराव पाटील शहाजी भोसले,दिपक देसाई,आनंदा देसाई, अमरदीप आपगे शिवाजी पाटील, जयसिंग पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आभार ग्रामविकास अधिकारी स्नेहदीप सरदेसाई यांनी मानले.
