श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर व्याख्यानमाला पुष्प पहिले वक्ते – डॉ. अक्षय बाफना विषय ‘तंदुरूस्त हृदय : निरोगी जीवन’.
आजरा.- प्रतिनिधी.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेची सुरवात सुप्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॉ. अक्षय बाफना यांच्या ‘तंदुरूस्त हृदय : निरोगी जीवन’ या विषयावरील व्याख्यानाने झाली.
डॉ. बाफना म्हणाले हृदय थांबले तर जीवन थांबते त्यामुळे हृदय तंदुरूस्त असेल तरच निरोगी जीवन जगता येते. रक्तदाब, रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल हे थेट हृदयावर परीणाम करणारे घटक आहेत. त्यामुळे या गोष्टी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे हृदयाच्या आरोग्यासाठी नैसगिक जीवनशैली आत्मसात करा, पोषक आहार, नियमित व्यायाम, ध्यानधारणा, योगसाधना व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने ह्यदय तंदुरूस्त राखणे शक्य आहे. दिवसातून किमान ४५ मिनीटे चालणे व शारीरिक व्यायाम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आठ तासाची बिनमोड झोप हृदयाच्या आरोग्यासाठी गरजेची आहे.
हृदय रोगाची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे हार्ट अॅटॅक आल्यास लवकर वैद्यकीय उपचार दिल्यास पेशंट वाचण्याची शक्यता अधिक असते आहारातील साखर, मिठ, तेल यांचा वापर मर्यादित करणे गरजेचे आहे. फास्टफूड, जंकफूड, कोल्डिंक्स, ज्यूस यांच्या ऐवजी फळे, भाजीपाला, कडधान्ये व सुकामेवा यांचा आहारात वापर करा असे डॉ. बाफना यांनी सांगीतले रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल याबाबतही त्यांनी चित्रफीतीच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थिती श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. सुरवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या फस्ते व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत होते. वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या भूमिपूत्र साहित्यिक गौरव पुस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले.

मूळचे आजरेकर असलेले गोवास्थीत ज्येष्ठ साहित्यिक अनिल परूळेकर यांना डॉ. सुधीर मुंज यांच्याहस्ते शाल, सन्मानपत्र, ग्रंथभेट व रोख पाच हजार रूपये देऊन गौरविण्यात आले अनिल परूळेकर व डॉ. सुधीर मुंज यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. अनिल देशपांडे, मुकुंददादा देसाई, मधुकर क्रमित, डॉ. दिपक सातोसकर, मारूती मोरे, आय. के. गिलबिले, डॉ. भरत मोहिते, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. रश्मी गाडगीळ, नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार, डॉ. गौरी भोसले, शुभांगी जोशी, उपाध्यक्षा विद्या हरेर, रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, गीता पोतदार, सुचेता गडडी ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यासह मोठ्या प्रमाणावर आजरेकर रसिक श्रोते उपस्थीत होते. वाचनालयाचे अध्यक्ष श्री वामन सामंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालिका डॉ. अंजनी देशपांडे यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला. कार्यवाह कुंडलिक नावलकर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.
