Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रपंचायत समिती कार्यालया समोर दि. ६ रोजी "बेमुदत आत्मक्लेष सत्याग्रही आंदोलन.- ग्रामपंचायत...

पंचायत समिती कार्यालया समोर दि. ६ रोजी “बेमुदत आत्मक्लेष सत्याग्रही आंदोलन.- ग्रामपंचायत – आरळगुंडी विरोधात – बेकायदेशीर रित्या पत्रव्यवहार करून माझ्यावर अन्याय.- सौ.सारिका विनोद देवेकर

पंचायत समिती कार्यालया समोर दि. ६ रोजी “बेमुदत आत्मक्लेष सत्याग्रही आंदोलन.- ग्रामपंचायत – आरळगुंडीविरोधात – बेकायदेशीर रित्या पत्रव्यवहार करून माझ्यावर अन्याय .-

गारगोटी.- प्रतिनिधी.

पंचायत समिती कार्यालया समोर दि. ६ रोजी “बेमुदत आत्मक्लेष सत्याग्रही आंदोलन”- सौ.सारिका विनोद देवेकर (ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियान-CRP) ग्रामपंचायत – आरळगुंडी कोणतीही सत्यता न पडताळता पत्रव्यवहार करून अन्याय करणाऱ्या लोकांना अभय व सूट दिली जात आहे. कोणत्याही पत्राचा विचार न करता मोघमपणे बेकायदेशीर रित्या पत्रव्यवहार करून माझ्यावर अन्याय केलेला आहे.

नैसर्गिक व न्यायिक तत्वाला धरुन, कायदेशीर न्याय्य न करता, अभियान कर्मचारी निलेश डवरी यांनी काढलेल्या व्हिडीओ शुटिंगची कोणतीच ‘सत्यता’ न तपासता अन्यायकारक बेकायदेशीर पत्रव्यवहार करणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच मंगळवार दि.05/08/2025 रोजी आरळगुंडी ग्रामसंघाच्या मिटींग बेकायदेशीररित्या मंदिरात कोंडून ठेवून शासकीय कामात अडथळा केलेला सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे.यासाठी मंगळवार दि.6/01/2026 रोजी पंचायत समिती कार्यालया समोर करणार आहे.
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, राज्य अभियान व्यवस्थापक कक्ष, बेलापूर नवी मुंबई यांच्याकडील पत्र- उमेद एम. एस. आर. एल. एम./एच.आर./कार्या-6/जा.क्र.2293/2025 दिनांक 24 /7/ 2025 व उमेद एम. एस. आर. एल. एम./एच.आर./कार्या-6/जा.क्र.5567/2025 दिनांक 05/12/ 2025 आणि जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे जा.क्र./एम. एस. आर. एल. एम./ आस्था /तक्रार समिती /974 /2025 दिनांक 23 /12 /2025 चे पत्र या कोणत्याही पत्राचा विचार न करता मोघमपणे बेकायदेशीर रित्या पत्रव्यवहार करून माझ्यावर अन्याय केलेला आहे. त्यामुळे तालुका अभियान व्यवस्थापक, उमेद अभियान व गटविकास अधिकारी, पंचायत समिती गारगोटी आणि इतर सर्व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.आणि त्यांची विभागीय सखोल चौकशी झाली पाहिजे.
नैसर्गिक व न्यायिक तत्वाला धरुन, न्याय्य न करता, कायदेशीर बाबींचा विचार न करता तसेच दि. 5/8/2025 रोजी आरळगुंडी गावात झालेल्या ग्रामसंघ महिलांच्या मिटिंग वेळी अभियान कर्मचारी निलेश डवरी यांनी काढलेल्या व्हिडीओ शुटिंगची कोणतीच ‘सत्यता’ न तपासता तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानकक्ष, पंचायत समिती, भुदरगड ता. भुदरगड जि. कोल्हापूर यांनी दि. 28/10/2025; दि 09/12/2025; दि. 19/12/2025 व दि.01/01/2026 रोजीची पत्रे दिलेली आहेत. ती सर्व पत्रे बेकायदेशीर व वस्तुस्थिती स्पष्टपणे पारदर्शक व खरी न मांडता. कायदा हातात घेणाऱ्यांच्या व शासकीय कामात अडथळा . करण्याऱ्यांची बाजू घेणारी आहेत.तालुका अभियान व्यवस्थापकसो,तालुका अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियान, गारगोटी ता.भुदरगड जि. कोल्हापूर यांनी हे व्हिडिओ शूटिंग व्यवस्थित न पाहिल्यामुळे मीटिंगमध्ये जे जे काही झाले ते प्रमुख मुद्दे जोडून हे निवेदन दिलेले आहे. याची गांभीर्याने दखल न घेता पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे सर्व संबंधितावर कायदेशीर कारवाई व गुन्हा नोंद करण्यात यावा.
मंगळवार दि.05/08/2025 रोजी तालुका अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियान अधिकारी यांनी आरळगुंडी गावात ग्रामसंघाची झालेल्या मिटिंगचे केलेले व्हिडीओ रेकॉर्डिंग आम्हाला त्यांनी लॅपटॉपमध्ये व मोबाईल मध्ये दिलेले आहेत. हा पुरावा म्हणून तालुका अभियान व्यवस्थापकसो, तालुका अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियान, गारगोटी ता.भुदरगड जि. कोल्हापूर यांनी गृहीत धरून, त्यानुसार कारवाई होऊन कार्यवाहीची अंमलबजावणी होणे गरजेचे असताना. चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने पत्रव्यवहार केला जात आहे पुरावा असतानाही त्या पुराव्याला बेदखल करून, त्यासंदर्भातील तालुका अभियान व्यवस्थापकसो,तालुका अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियान, गारगोटी यांनी पाठवलेल्या सर्व पत्रांशी मी सहमत नाही.
तालुका अभियान व्यवस्थापकसो,तालुका अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियान, गारगोटी यांनी हे व्हिडिओ शूटिंग व्यवस्थित न पाहिल्यामुळे मी या पत्रासोबत मीटिंगमध्ये जे जे काही झाले ते प्रमुख मुद्दे जोडून हे निवेदन दिलेले असताना. गटविकास अधिकारीसो, पंचायत समिती व तालुका अभियान व्यवस्थापकसो, तालुका अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियान, गारगोटी यांनी याची गांभीर्याने नोंद घेतलेली नाही. ही खूप गंभीर बाब आहे.
यासाठी मंगळवार दि.6/01/2026 रोजी पंचायत समिती कार्यालया समोर मी सौ.सारिका विनोद देवेकर (ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियान-CRP) ग्रामपंचायत – आरळगुंडी ता. भुदरगड जि. कोल्हापूर “बेमुदत आत्मक्लेष सत्याग्रही आंदोलन” करणार आहे. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही न्यायिक बाजूने तोपर्यंत हे बेमुदत आत्मकलेश आंदोलन चालू राहणार आहे. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.