उत्तूर जिल्हा परिषदेसाठी शिरीष देसाई तर पंचायत समितीसाठी विकास चोथे यांची उमेदवारी जाहीर.
उत्तुर. – वार्ताहर.
उत्तूर ता. आजरा येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी नामदार हसन मुश्रीफ होते. यावेळी मेळाव्यात उत्तुर जिल्हा परिषदेसाठी शिरीष देसाई तर पंचायत समितीसाठी विकास चोथे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. स्वागत संभाजी तांबेकर यांनी केले.
प्रास्ताविक शिरीष देसाई यांनी केले. माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली व वसंतराव धुरे यांनी मनोगते व्यक्त केली.
सूत्रसंचालन गणपतराव सांगले यांनी केले.

आभार आजरा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संजय येजरे यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, विश्वासराव देसाई, मारुतराव घोरपडे, दीपक देसाई, एम के देसाई, राजू मुरकुटे, उत्तम रेडेकर, विकास चोथे, महादेव पाटील, बबन पाटील, सुधीर सावंत, सुनील दिवटे, विजय वांगणेकर, सागर सरोळकर, सचिन पावले, शंकर पावले, सुनील देसाई, भूषण नाधवडेकर, आदीप्रमुख उपस्थित होते.
