Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रचंदगड - हलकर्णी रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल.- तहसीलदार यांना संयुक्त बैठकीचे आजरा शिवसेनेचे...

चंदगड – हलकर्णी रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल.- तहसीलदार यांना संयुक्त बैठकीचे आजरा शिवसेनेचे निवेदन🛑जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या नवनियुक्त संचालकांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

चंदगड – हलकर्णी रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल.- तहसीलदार यांना संयुक्त बैठकीचे
आजरा शिवसेनेचे निवेदन
🛑जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या नवनियुक्त संचालकांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

🟣जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या नवनियुक्त संचालकांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या नवनियुक्त संचालकांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या गृह तारण संस्थेने मार्च २०२५ अखेर १०० कोटी आणि आजपर्यंत १११ कोटीहून अधिक ठेवी संकलन करून जनता सहकारी गृहतारण संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे. हा विश्वास वृदधिंगत करणे आणि सातत्य राखणे ही संस्थेची जबाबदारी आहे. येथून पुढील काळात येणाऱ्या नवनवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सदैव तयार असले पाहिजे. त्यासाठी नवनवीन उपाययोजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी अशाप्रकारच्या शिबीरांचे आयोजन गरजेचे असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष मारूती मोरे यांनी केले. जनता सहकारी गृहतारण संस्था मर्यादित आजराच्या नवनियुक्त संचालक मंडळासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की संस्थेची भरभराट ही संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या गुणवत्तेवरती अवलंबून असते. गुणवत्ता निर्माण करण्याकरिता परस्परांच्या क्षमता समजून घेणे आणि विचार जाणून घेणे आवश्यक असते. तरच संस्थेची भरभराट साधता येते.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर अशोक बाचूळकर यांनी केले. दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या शिबीरात गडहिंग्लज शाखा चेअरमन श्री. प्रकाश पोवार, कोल्हापूर शाखा चेअरनमन प्रो. (डॉ.) गोपाळ गावडे, गारगोटी शाखा चेअरमन प्रा. श्री. आनंद चव्हाण, इचलकंरजी शाखा चेअरमन श्री. प्रकाश शिंदे, सांगली शाखा चेअरमन प्रो. (डॉ.) संजयकुमार गायकवाड, पाटणे फाटा शाखा चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक दोरुगडे यांनी शाखा आढावा घेत. २०३० सालापर्यंतचे शाखांचे नियोजनाबद्दल सविस्तर चर्चा करुन काही विधायक सूचना केल्या.

पुढील पाच वर्षांमध्ये संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या व सुरू केल्या जाणाऱ्या नवनवीन गृह कर्ज योजना आणि त्या योजना बददल साकल्याने विचार करण्यात आला व चिंतन शिबिरामध्ये शिवाजी विदयापीठ प्राचार्य असोसिएशनच्या “उपाध्यक्षपदी” निवड झाल्याबद्दल प्राचार्य, डॉ. एस. बी. भांबर, राजा शिवछत्रपती महाविदयालय महागाव च्या “प्रभारी प्राचार्यपदी” निवड झाल्याबद्दल डॉ. सुगंधा घरपणकर, सहकार भारतीच्या भुदरगड “तालुकाध्यक्ष” पदी निवडीबद्दल गारगोटी शाखेचे चेअरमन प्राध्यापक आनंद चव्हाण आणि आजरा नगरपंचायतीच्या “नगराध्यक्ष” पदी निवड झाल्याबद्दल मा. श्री. अशोक अण्णा चराटी व “नगरसेवक” पदी निवड झाल्याबद्दल श्री. अनिकेत चराटी यांचा शॉल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गडहिंग्लज शाखेचे संचालक प्रा. (डॉ.) महेश कदम यांचा वाढदिवस ‘केक’ कापून साजरा करण्यात आला.

प्रशिक्षण शिबीराचे सुत्रसंचालन प्रा. सौ. नेहा पेडणेकर यांनी ओघवत्या स्वरूपात केले. कार्यक्रमाचे आभार संचालक प्रा. आनंद चव्हाण यांनी मानले. सदरचे प्रशिक्षण शिबीर ‘चाळोबा हिल्स’ येथे निर्सर्गाच्या सानिध्यात यशस्वीपणे पार पडले.

🛑चंदगड – हलकर्णी रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल.- तहसीलदार यांना संयुक्त बैठकीचे आजरा शिवसेनेचे निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

चंदगड – चंदगड रस्त्याचे काम चालू असून त्या कामासंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आजरा शिवसेना कार्यालय कडे येत आहेत. येथील रस्त्याच्या कामाचा दर्जा स्थानिक पातळी वरील ग्रामपंचायत हद्दीतील होणारे नुकसान याबाबत संबंधित ठेकेदार उदासीन भूमिका घेत आहेत या ठेकेदाराबाबत विविध गावातील नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्यात असंतोष आहे या संदर्भातील अनेक तक्रारी असून या विषयासंदर्भात ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन समाधानकारक तोडगा काढावा यानंतरच पुढील काम चालू करावे ते दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत तालुकाप्रमुख संजय पाटील शहर प्रमुख विजय थोरवत इंद्रजीत देसाई सह पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.