खेडेत – सदगुरु भर्तरीनाथ महाराज याच्या दहाव्या पुण्यतिथी ऊत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

खेडे ता. आजरा येथील ओम ब्रम्ह चैतन्य सिध्द सदगुरु भर्तरीनाथ महाराज याच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्ताने वारकरी पंरपंराने दिप प्रज्वलन विना पुजन अभिषेक हरिपाठ पालखी मिरवणूक व महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय आजरा च्या वतीने व हभप अशोक तर्डेकर यांच्या संकल्पनेतून हरिपाठ छोट्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. या वेळी तर्डेकर यांनी वारकरी संप्रदाय हा मानवी कल्याण आणी आध्यात्मिक समाधानातून प्रगती कडे जाणारी वाटचाल असून नवीन वर्षीच्या स्वागतासाठी हरिपाठ छोटी पुस्तीका घराघरात वाटून वारकरी संप्रदायाची पताका नव्याने समाजात रुजवण्याची गरज असेलचे सांगितले.

माजी जि.प अध्यक्ष उमेश आपटे यांनी आषाढी निमित्ताने पंढरपूरात तीन दिवस राहिल्याने संताचा सहवास लाभला हा प्रमेश्वारीचा संकेत समजून भागवत धर्माच्या सोबत जाणे आवश्यक असलेचे सांगितले. यावेळी एस के पाटील, राजाराम जाधव यानी मनोगत व्यक्त केले यावेळी खेडे मठाचे रमेश चौगुले श्रीरंग सातूसे, रवी भाटले,राजू होलम, गोविंद पाटील,शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, यूवराज पोवार रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय मंडळ तालुका अध्यक्ष गौरोजी सुतार, संतू कांबळे, पांडुरंग जोशिलकर, दिपाली गुरव, कल्पना जाधव,शांताबाई चौगुले, शिवाजी गावडे, पांडूरंग पाटील,बाबू धुरे, सुर्यकांत गुरव, सचिन तपकिरे, पांडूरंग होलम याच्या सह तालुक्यातील वारकरी भक्तगण ऊपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार संजय घाटगे यानी मानले.

