Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा सुलगाव नजीक अपघात.- ओमणीची आयशरधडक.

आजरा सुलगाव नजीक अपघात.- ओमणीची आयशरधडक.

आजरा सुलगाव नजीक अपघात.- ओमणीची आयशर
धडक.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा आंबोली रोड येथील सुलगाव नजीक ओमनी व आयशर गाडीची धडक झाल्याने अपघात झाला. याबाबत
फिर्यादी अविनाश वसंत राठोड वय 39 रा जहागिरदारवाडी ता. धाराशिव जि. धाराशिव, यांनी आरोपी मनिष श्रीकांत सोलापुरे रा गडहिंग्लज जि कोल्हापूर, याच्यावर पोलिसात फिर्याद दिली आहे. यानुसार दि. २४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातामधील जखमी – 1) मनिष श्रीकांत सोलापुरे रा गडहिंग्लज (चालक) गीता कृष्णा कांबळे रा गडहिंग्लज अपघातातील मयत कृष्णा कलाप्पा कांबळे रा गडहिंग्लज अपघातामधील वाहन ओमणी चारचाकी नं MH-02-AY-4180, आयशर टेंम्पो नं MH-25-AJ-7880 यातील हकिकत फिर्यादी यांचे मालकीचा त्यांचे ताबेतील आयशर टैम्पो नं MH-25-AJ-7880 यास आरोपी मनिष श्रीकांत सोलापुरे रा गडहिंग्लज याने त्याचे ताबेतील ओमणी चारचाकी नंबर MH-02-AY-4180 ही रस्त्याचे परिस्थीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन रस्त्याचे राँग साईडला येवुन फिर्यादीचे आयशर टेंम्पो यास समोरुन जोराची धडक देवून झालेल्या अपघातामध्ये आरोपी हा स्वत गंभीर जखमी होवून ओमणी गाडीतील गीता कृष्णा कांबळे हीस जखमी करणेस व कृष्णा कलाप्पा कांबळे यास अपघातात गंभीर जखमी करुन त्याचे मयतास व दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभुत झालेबाबत वगैरे मजकुरची फिर्यादी यांनी फिर्यादी दिलेने वर नमुद कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करुन दाखल गुन्ह्याचा पुढील तपास मा. स.पो.नि. यांचे आदेशाने पो. हे. काँ. 2099 येलकर यांचेकडे दिला आहे.
दाखल अंमलदार म पो.हे.काँ. 2039 मुगडे. तपासी अंमलदार पो.हे.काँ. 2099 येलकर अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.