वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची
ऊस बिले जमा. ऊस उत्पादकांनी नोंद घ्यावी.- चेअरमन मुकुंदराव देसाई.
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालु सन 2025-26 या चालु हंगामात आजअखेर 110000 मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे. कारखान्याकडे दि.04.11.2025 ते 15.11.2025 अखेर गाळप झालेल्या 36594 मे. टनाचे ऊसाची बिले प्रतिटन रू.3400/- प्रमाणे विनाकपात होणारी रक्कम रू.12 कोटी 44 लाख 21 हजार ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन, श्री. मुकुंदराव देसाई यांनी दिली.
हंगाम 2025-26 मध्ये करखाना व्यवस्थापनाने ठेवलेल्या उददीष्टा प्रमाणे गाळपाचे नियोजन केले असुन सद्या येत असलेल्या ऊसाचे गाळप करून त्यापासुन जास्तीत जास्त साखर उत्पादन मिळविणेचा प्रयत्न करीत आहोत. कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या बीड व स्थानिक तोडणी-वाहतुक यंत्रणेस प्राधान्याने कारखान्याकडे करार झालेल्या ऊसाची उचल करणेचे काम सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष मा.ना. हसन मुश्रीफसाहेब, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा केली जाणार आहेत.
कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून शेतक-यांचे ऊस कारखान्याकडे गळीतास आणुन ऊस उत्पादकांची अडचण होणार नाही याची दक्षता घेत आहोत. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे, विष्णु केसरकर, उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी सुधिर देसाई, संचालक मधुकर देसाई, मारूती घोरपडे, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी पाटील (हात्तीवडे), शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, संभाजी पाटील, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस. के. सावंत उपस्थित होते.
