मलिग्रे हायस्कूल ऊर्जित आवस्थेत आणणार. – दत्ता मराठे अध्यक्ष मलिग्रे ग्रामसेवा मंडळ मुंबई.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील पूर्व भागातील मलिग्रे हायस्कूल हे सर्वात पहिले व नामवंत हायस्कूल म्हणून पाहिले जाते. १९७२साली जुन्या जाणत्या अशिक्षित मंडळीनी, गावचा विकास डोळ्या समोर ठेऊन मुलाच्या शैक्षणीक प्रगती करीता, महात्मा फुले हायस्कूल महागावच्या शाखेची स्थापना करून गोर गरीब बहूजन समाजाच्या मुलाच्या शिक्षणाची सोय करून दिली. अनंत अडचणीतून शिक्षक व ग्रामस्थांनी या शाळेला योगदान दिले. पण आज या शाळेची दैनिय अवस्था झाली असून गावच्या एकोप्यातून या हायस्कूल ला पून्हा ऊर्जित आवस्थेत आणणार असलेचे दत्ता मराठे मुंबई ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या.
मराठे यांनी हायस्कूलच्या एकून कामकाजाचा आढावा घेत, मंडळाची स्वतः ची शाळा इमारत व प्रशस्त मैदान असून ही, महागावच्या संस्था चालकांनी या शाखेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, मनमानी केल्याने व शिक्षेकांची आदलाबदल करून शैक्षणिक धोरणाप्रमाणे सेवा सुविधा नाकारल्याने या हायस्कूलची दुरावस्था झाल्याचा गंभीर आरोप केला. यासाठीच डिसेंबर मध्येच ग्रामसभा घेऊन ग्रामस्थाच्या अडचणी समजावून घेत, संस्था चालकाना चार महीण्याची संधी देत असल्याचे सागितले.
यावेळी मुंबई मंडळचे माजी अध्यक्ष व साखर कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनी मुंबई मंडळाने गावच्या शाळेच्या अडचणी साठी मंडळा मार्फत शाळा इमारत व इतर सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी पून्हा देणगीरूपाने मंडळ व माझी विध्यार्थी मदत करतील पण संस्था चालकानी वेळीच लक्ष द्यावे. तसेच शिक्षणाचा दर्जा कमी झाल्याने ग्रामस्थानी मुले इतर संस्थेकडे पाठवली या मुलाचा सर्वे करून, पालकांनची मानसिकता तयार करून घेऊन, पटसंख्या वाढी साठी व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी संस्था चालकाबरोबर निर्णय होत नसेल तर,पर्यायी मार्ग शोधून गावची शाळा वाचवण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. माझी सरपंच समिर पारदे यांनी आमची शाळा म्हणून या शाळेकडे पाहीले आहे परंतू २०१६ पासून संस्था अध्यक्ष भेटत नाहीत. त्याना शाखा चालवणे शक्य नसेलतर ग्रामस्थाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी केली.
माझी सरपंच अशोक शिंदे यानी पंचवीस वर्षी पूर्वी शाळा गावच्या ताब्यात असावी यासाठीच प्रयत्न केला होता.
तर ग्रामसभा अध्यक्ष सरपंच शारदा गुरव यांनी शिक्षण गुणवत्ता पुर्ण असेल तरच गावचा विकास होतो यासाठी मुंबई मंडळने घेतलेली भुमिका योग्य असून मलिग्रे ग्रामस्थ पाठीशी असलेचे सांगितले. यावेळी संजय घाटगे सुरेश पारदे, अनिल कागिनकर, शिवाजी भगुत्रे, विजय बुगडे,विश्वास बुगडे, अनिल तर्डेकर यानी मनोगत व्यक्त केली. यावेळी उपसरपंच चाळू केंगारे, शोभा जाधव, सुरेखा तर्डेकर, विठ्ठल नेसरीकर, ऊत्तम भगूत्रे, महादेव तर्डेकर, श्रीपाद देशपांडे, तानाजी भणगे, ऊदय देशपांडे, प्रकाश सावंत, कृष्णा जाधव याच्यासह मुंबई मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते आभार अनिल आसबे यांनी मानले.
