राजे फाउंडेशनच्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये ५१८ जणांच्तया आरोग्याची तपासणी. ( मडिलगेतील आरोग्य शिबीराला उत्सफुर्त प्रतिसाद.)
उत्तूर.- प्रतिनिधी.
मडिलगे (ता.आजरा) येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्यावतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये ५१८ जणांची तपासणी करण्यात आली. शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या आरोग्य शिबिरामध्ये हृदयविकार, मूत्रविकार,डोळे तपासणी ,जनरल तपासणी तसेच मोफत रक्त तपासणी करण्यात आली.आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, इसीजी तसेच निशुल्क औषध वाटप केले.याचा लाभ मडिलगे तसेच परिसरातील नागरिकांनी घेतला. अध्यक्षस्थानी के.व्ही.येसणे होते.
शाहू कारखान्याचे संस्थापक राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, राजे बँकेचे अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाउंडेशन,राजे बँक व लोकमान्य समुहाच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले होते.

या आरोग्य शिबिरामध्ये सिद्धिविनायक नर्सिंग होम कोल्हापूर , प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण,मोरया हाॕस्पिटल कोल्हापूर,केदारी रेडेकर हाॕस्पिटल गडहिंग्लज व संकल्पसिद्धी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कागल येथील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत, संचालक रविंद्र घोरपडे, रणजीत पाटील,सुशांत कालेकर, कार्यकारी संचालक अरुण पाटील भादवणच्या सरपंच माधुरी गाडे, सरपंच बापू निऊगरे, माजी सभापती भिकाजी गुरव, सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील मुख्याध्यापक सावंत मुख्याध्यापिका माधुरी मोरे संदीप गुरव सूर्यकांत पाटील, प्रविण लोकरे, डी. बी. सावंत, मंदार हळवणकर, चंद्रकांत देसाई, सुदाम सावर्डेकर, जालंदर येसणे शाळा समिती अध्यक्ष, मारुती येसणे, हिंदूराव कांबळे सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमान्य समुहाचे संस्थापक जनार्दन नेऊंगरे यांनी स्वागत केले. विजय परुळेकर यांनी आभार मानले.
