Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रगवसे आरोग्य केंद्र शासनाकडे नोंदच नाही. - यामुळे पदभरती होत नाही.- गवसे...

गवसे आरोग्य केंद्र शासनाकडे नोंदच नाही. – यामुळे पदभरती होत नाही.- गवसे आरोग्य विभागाची माहिती.( गवसे आरोग्य विभाग व उबाठा शिवसेनेची बैठक – आरोग्य मंत्र्यांच्याकडे मागणी करणार. )

गवसे आरोग्य केंद्र शासनाकडे नोंदच नाही. – यामुळे पदभरती होत नाही.- गवसे आरोग्य विभागाची माहिती.
( गवसे आरोग्य विभाग व उबाठा शिवसेनेची बैठक – आरोग्य मंत्र्यांच्याकडे मागणी करणार. )

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील नव्याने झालेले गवसे आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी, डॉक्टर, विविध १३ कर्मचारी व बाह्य सुविधा वगळता अन्य सुविधा नसल्याने आजरा ता. शिवसेना उबाठा सेनेच्या वतीने निवेदन देऊन आरोग्य विभाग गवसे विभाग यांच्याकडे बैठकिची मागणी केली होती.
या अनुषंगाने शुक्रवार दि. ५/१२/२०२५ रोजी बैठक संपन्न झाली.
आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र गुरव यांच्याशी सह कर्मचारी यांच्याशी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख युवराज पोवार सह पदाधिकारी यांनी
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध योजना राबविण्यात येतात पण त्यासाठी जे रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी नाहीत. तर मग हा दवाखाना कशासाठी आहे. हा प्रश्न राजकीय नाही. सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यामुळेच आपल्याला विरोध म्हणून आम्ही आलो नाही. या विभागातील १३ गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आलो आहोत.
या विषयावर बोलताना डॉ. राजेंद्र गुरव म्हणाले आम्ही वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा आजही चालू आहे. आम्ही जिल्हा आरोग्य विभागाकडे
अन्य सुविधा, कर्मचारी, सर्व सुविधा बाबत मागणी केली पण अद्यापही याबाबत काही यश आले नाही. आम्हाला खात्री आहे. लवकरच महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आमच्या मागण्या
पूर्ण होऊन गावचे आरोग्य केंद्रात सर्व उपकेंद्रांना सुविधा मिळतील असे श्री.गुरुव यांनी सांगितले.

याबाबत तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी यामध्ये स्थानिक कर्मचारी यांची कोणती चुकी नसून या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत. फक्त बिल्डिंग आहे. कर्मचारी नाहीत तर स्थानिक अधिकारी काय करणार या विषयाबाबत कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून आरोग्य मंत्री यांच्याकडे सर्व सुविधा पुरवाव्यात, व या दवाखान्याची शासन दरबारी नोंद व्हावी. याबाबतची मागणी करणार असल्याचे यावेळी सांगितले.
या बैठकीला डॉ. श्री. आर.जी. गुरव (तालुका आरोग्य अधिकारी) पंचायत समिती आजरा, व्ही.ए. काटकर (विस्तार अधिकारी आरोग्य), श्रीम.एम.बी.भांडकोळी (बीएनओ) तसेच डॉ. मोरे (वैदयकिय अधिकारी) उपतालुकाप्रमुख शिवाजी आढाव, शेतकरी सेना दिनेश कांबळे, माजी सरपंच तातोबा पाटील, भिकाजी पाटील प्रकाश मोरुस्कर परशुराम शेटगे महेश पाटील जयवंत पाटकर संजय पाटील मयूर पाटील सह पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट.

आरोग्य विभाग यांनी दिलेली लेखी माहिती.- राष्ट्रीय आरोग्य अभियान” ( तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती आजरा.)
bpmu.ajarad@rediffmail.com
( 204 जाक/पंसआ//२०२५)

आरोग्य विभाग पंचायत समिती आजरा – दि. ५/१२/२०२५

बैठकीचा कार्यवृत्तांत.-
युवराज श्यामराव पोवार
तालुका प्रमूख (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे)

विषय- आजरा तालुक्यातील गवसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स व स्टाफ उपलब्ध निवेदनाबाबत
संदर्भ- प्राथमिक आरोग्य केंद गबसे ता आजरा येथे नविन इमारत बांधकाम करुन एक वर्ष झाले, परंतू अजूनही त्या ठिकाणी डॉक्टर्स व इतर कर्मचारी उपलब्ध नाहीत. यामुळे या भागातील नागरीकांना वैदयकिय सेवा मिळत नाहीत यासाठी शुक्रवार दि. ५/१२/२०२५ इ. रोजी दुपारी १२.०० वाजता गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे यासंदर्भात माहिती देण्यासाठी हजर रहाणे बाबत वरील संदर्भाने या कार्यालयास निवेदण दिले होते.

डॉ. श्री. आर.जी. गुरव (तालुका आरोग्य अधिकारी) पंचायत समिती आजरा, श्री.व्ही.ए. काटकर (विस्तार अधिकारी आरोग्य), श्रीम.एम.बी. भांडकोळी (बीएनओ) तसेच डॉ. मोरे (वैदयकिय अधिकारी), आरोग्य सेविका सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र गवसे येथे
त्याचबरोबर युवराज पोवार (तालुका प्रमूख), संभाजी पाटील (उपजिल्हा प्रमूख), अमित गुरव (युवासेना उपतालुका प्रमूख), दिनेश कांबळे (शेतकरी सेना तालुका अध्यक्ष), महेश पाटील (युवासेना उपजिल्हा प्रमूख),चंद्रकांत व्हरकटे (शिवसेना उपतालुका संघटक), रवि सावंत (शाखा प्रमूख), रविद्र यावद (शाखा प्रमूख), राजू बंडगर (वाहतूक सेना प्रमूख) तसेच गवसे पंचक्रोशितील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

१. डॉ. आर.जी. गुरव (तालुका आरोग्य अधिकारी ) पंचायत समिती आजरा यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे निवेदनाबद्दल स्वागत केले.

२. कार्यकर्त्यांनी नविन इमारत बांधकाम करुन एक वर्ष झाले, परंतू अजूनही त्या ठिकाणी डॉक्टर्स व इतर कर्मचारी उपलब्ध नाहीत याबाबत तुम्ही तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काय कार्यवाही केली याबाबत विचारणा केली असता, तालुका आरोग्य अधिकारी यांनी आजअखेर आम्ही जिल्हा आरोग्य

  1. अधिकारी कार्यालय जि.प. कोल्हापूर यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे दाखविले. तसेच त्या पत्राच्या झेरॉक्स प्रति त्यांच्या मागिणीप्रमाणे संबंधीतांना देण्यात आल्या.

३. सदर प्रा.आ.केंद्राला अजून कार्यक्षेत्रातील कोणकोणती गावे व उपकेंद्रे जोडण्यात आलेली आहेत याची माहिती विचारणा करण्यात आली. त्यावर तालुका आरोग्य अधिकारी यांनी सदरच्या कार्यक्षेत्राचे कामकाज प्रा. आ. केंद्र वाटंगी मार्फत सुरु असल्याचे सांगीतले. गबसे प्रा.आ. केंद्रामध्ये संपूर्ण कर्मचारी भरल्यानंतर सदरचे कार्यक्षेत्र वाटप करण्यात येईल असे सांगीतले.

४. आज समजा प्रा.आ. केंद्रामध्ये प्रसूतीसाठी महिला किंवा सर्पदंशाचा रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करु शकता काय? असे विचारले त्यावर तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रसूतीसाठी लागणारे साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे सांगीतले तसेच सर्पदंशासाठी लस उपलब्ध असल्याचे सांगीतले.

५. प्राथमिक आरोग्य केंद्र गवसे या ठिकाणी सध्दा फक्त बाहयरुग्ण विभाग सूरु आहे. बाकी आरोग्याच्या कोणत्याही सेवा नागरीकांना मिळत नसल्याचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगीतले.

वरीलप्रमाणे उपरोक्त निवेदणास अनुसरुन उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्त यांच्या बरोबर मिटींग संपन्न झाली. बैठकी त झालेली चर्चा व मागण्या लेखी पत्र द्वारे देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.