वन्यप्राण्यांपासून नुकसान भरपाईसह मानवी व वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी – आजरा वनपरिक्षेत्र कार्यालयावर २३ डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन
आजरा :- प्रतिनिधी.
वन्यप्राण्यांपासून नुकसान भरपाई मिळण्यासाठी व मानवी आणि वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी मंगळावर दि २३ डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय येथील सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. काँ. संपत देसाई अध्यक्षस्थानी होते.
यावेळी काँ. देसाई म्हणाले, येथील संभाजी चौकात आजरा तालुक्यातील विविध पक्ष संघटनांच्या वतीने ६ नोव्हेंबर २०२५ रोजी ठिय्या आंदोलन केले होते.

यावेळी आजरा परिक्षेत्र वनाधिकारी यांनी पंधरा दिवसाच्या आत उपवनसरंक्षक यांचे उपस्थितीत बैठक लावण्याचे लेखी पत्र दिले होते. त्याला आता महिना उलटून गेला तरी अजूनही बैठक झालेली नाही. त्यामुळे आंदोलन केल्याशिवाय वनविभागाला जाग येणार नाही. यावेळी ठाकरे सेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, रविंद्र भाटले, प्रकाश मोरूसकर आदींनी चर्चेत भाग घेतला. यावेळी काँ. शांताराम पाटील, बाबू येडगे, दशरथ घुरे, संजय घाटगे, दिनेश कांबळे, मारूती पाटील, काँ.दत्ता कांबळे, परशुराम शेटगे आदी उपस्थित होते.
