Homeकोंकण - ठाणेआजरा हायस्कूल- एन. एम. एम.एस. परिक्षेत उज्ज्वल यश.( तालुक्यातील सार्वधिक १८ विद्यार्थ्यांना...

आजरा हायस्कूल- एन. एम. एम.एस. परिक्षेत उज्ज्वल यश.( तालुक्यातील सार्वधिक १८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यश.)

आजरा. प्रतिनिधी.

जनता एज्युकेशन सोसायटी संचलित आजरा हायस्कूलने केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एन. एम. एम.एस आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत आजरा तालुक्यातील सार्वधिक १८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवून देण्यात यश मिळवले दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या परीक्षेत यश मिळवताना तब्बल १८ विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी ते ४८ हजार रुपये प्रमाणे ८ लाख ६४ हजार इतक्या रकमेचा गरीब विद्यार्थ्यांना लाभ करून देणारी आजरा तालुक्यातील एकमेव शाळा असा लौकिक मिळवला असता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणे या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक एस. बी. पाटील आय.डी. फर्नांडिस, सौ. टि. एस. पाटील, सौ. बी. पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले प्रशालेतील शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे.

वैभवी उदय सरदेसाई लाटगाव, शुभम चंद्रकांत केसरकर आजरा, प्रतीक्षा संजय माडभगत देवकांडगाव, मुक्ता अरविंद ठाणेकर वेळवट्टी, विजित सचिन मोरवळे आजरा, संयोगिता संजय सुतार आजरा, सलोनी चिदानंद दोडमनी आजरा, अथर्व विजय केसरकर आजरा, सुरभी भीमराव कांबळे बुरुडे, ऋतुजा दिलीप कांबळे सोहाळे, मिसवा फिय्याज आगा आजरा, ऋतुजा सागर कांबळे देवकांडगाव, उत्तम बयाजी येडगे, आंवडी धनगर वाडा क्रमांक १, सानिका राजू करमळकर आजरा, कुणाल नाना चौगुले मासेवाडी, समर्थ सचिन टोपले आजरा, राज सुनील गुरव मसोली, सुमित सुभाष चौगुले मासेवाडी, वरील यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी व सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. येसने, उपमुख्याध्यापक आय.डी फर्नांडिस पर्यवेक्षक एस.आर. कुलकर्णी यांचे प्रोत्साहन लाभले विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक व पालक सर्व स्तरावर यांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.