आजरा. प्रतिनिधी. २०
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व जूनियर कॉलेज आजरा येथे ८वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आली होती आर्थिक दृष्ट्या मागास दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना सदर परीक्षा दरवर्षी घेण्यात येते विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच आर्थिक हातभार लावण्यासाठी शालेय स्तरावरील ही अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते ४ वर्षात प्रतिवर्षी ४८ हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.
गुणवंत विद्यार्थी पुढील.
प्रमाणे
इंचनाळकर निंदा आदम, गुरव सिद्धेश एकनाथ, गुरव त्रिवेणी पंढरीनाथ, कांबळे नियती विकास, काणेकर सिद्धेश दत्तात्रय, जाधव राजलक्ष्मी व्यंकटराव या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळाले सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे व्यंकटराव हायस्कूल प्रशालेचे प्राचार्य एस बी गुरव, प्रशिक्षक एस. जी.खोराटे प्रोत्साहन मार्गदर्शक शिक्षक सहशिक्षक किशोर खोत, सौ ए.के. गुरव, आर. पी. ठोकरे, सौ. एस.एन नाईक, यांचे मार्गदर्शन लाभले.
