🔶ताराराणी विकास आघाडीचे – आज – भव्य सभा व रॅलीचे आयोजन.( मंत्री महोदय, खासदार यांची प्रमुख उपस्थिती.)
आजरा.- प्रतिनिधी.

आज रविवार दि ३० नोव्हेंबर २०२५ रोजी ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचारार्थ सकाळी नऊ वा. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ
यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच ठीक अकरा वाजता बाजार मैदान. ( शिवतीर्थाच्या मागील बाजूस ) या ठिकाणी भव्य *प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी ताराराणी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व आजरा शहरातील मतदार बंधू भगिनींनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन ताराराणी विकास आघाडीच्या आघाडी प्रमुख सह सर्व उमेदवारांनी केले आहे.
