🟠ताराराणी आघाडीची ढोल–ताशांच्या गजरात उत्साहवर्धक व भव्य प्रचार रॅली.
( प्रभाग क्रमांक एक व दोन मध्ये रॅली उत्साहात संपन्न.)
🟣मला सामाजिक कार्याची आवड.- अन्याय विरुद्ध लढण्याची प्रेरणा.- नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंजूर मुजावर मुलाखत. ( माझे चिन्ह कप बशी… ध्यानात मनात ठेवा कप बशी )
🛑मा. सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली योग्य आणि दर्जेदार विकासासाठीच – संजय भाऊ सावंत याना पाठींबा : बाफीव खेडेकर.
आजरा .- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडीकडून प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. ढोल, हलगी, ताशा आणि महिलांच्या मोठ्या संख्येतील सहभागामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवाजीनगर, जिजामाता कॉलनी आणि नबापूर या घनदाट लोकवस्तीच्या परिसरात घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत उमेदवारांना व्यापक पाठिंबा मिळाला.

⭐नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक अण्णा चराटी यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
ताराराणी आघाडीचे प्रमुख व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी हे रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. नागरिकांनी उत्साहपूर्ण घोषणांनी, भगवे झेंडे आणि फुलांच्या वर्षावाने अण्णांचे भव्य स्वागत करत त्यांना प्रचंड पाठींबा असल्याचे दाखवून दिले.

⭐प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार सौ. पूजा अश्विन डोंगरे यांचा दमदार जनसंपर्क
नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ. पूजा अश्विन डोंगरे यांनीही आपल्या प्रभागातील प्रत्येक मतदाराशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. परिसरातील तरुण आणि महिलांकडून त्यांना दाद मिळत असल्याचे रॅलीदरम्यान स्पष्ट दिसून आले.
⭐ढोल–ताशांच्या गजरात घरोघरी पोहोचलेला प्रचार
ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ढोल–ताशा, हलगी आणि उत्साहपूर्ण घोषणांसह घराघरांत जाऊन मतदारांना निवडणुकीतील महत्त्व सांगितले.
महिलांचा विशेष सहभाग ही या रॅलीची खास ओळख ठरली. संपूर्ण परिसर रॅलीमुळे सणासुदीच्या वातावरणाने उजळला होता.
⭐मान्यवरांची उपस्थिती रॅलीला मिळालेला भक्कम पाठिंबा दर्शवणारी.
या रॅलीला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीच्या प्रचाराचा वेग अधिक वाढवण्यासाठी ताराराणी आघाडीच्या वतीने आज सायंकाळी प्रभाग क्रमांक एकामध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
💥आजरा मनसेचा ताराराणी विकास आघाडीला पाठिंबा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका.- यांचा आजरा शहराच्या विकासासाठी ताराराणी विकास आघाडीला पाठिंबा. तालुकाध्यक्ष आनंदा, महिला आघाडी ता. प्रमुख सरिता सावंत घंटे, अॅ सुशांत पोवार, सह पदाधिकारी उपस्थित होते.

🟣ताराराणी आघाडीची प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद.
आजरा : – प्रतिनिधी.

ताराराणी आघाडीकडून प्रभाग क्रमांक एकमध्ये प्रचाराची जोरदार सुरुवात झाली. प्रभागातील विद्यानगर, भारतनगर आणि बळीराम देसाई कॉलनी परिसरात ढोल-ताशे व हलगीच्या गजरात भव्य घर-घर प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रभाग एकच्या नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. अश्विनी संजय चव्हाण तसेच नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री. अशोक अण्णा चराटी यांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन विकासाच्या आश्वासनांसह आपली दृष्टी मांडली.

आघाडीचे निवडणूक चिन्ह शिट्टी… शीट्टीच्या जोरदार उत्साहात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात रॅली उत्साहात पार पडली. नागरिकांनीही जोरदार प्रतिसाद देत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

रॅलीला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. नामदार माननीय प्रकाशराव आबिटकर यांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र भोसले यांच्यासह शिवाजी गुडुळकर, आर. टी. जाधव सर, आय. के. गिलबिले सर, जयवंत पाटील, बाळासाहेब पांडव, अमर जाधव, याकूब बागवान, बारिश घोळ, श्रीधर चव्हाण, श्रीधर कळेकर, आनंदा चव्हाण, गुलाब बागवान, इलाई बागवान, पुंडलिक कोल्हे, पांडू कोल्हे, अरुण नाईक, अनिल नाईक, किरण नाईक, तानाजी नाईक, महादेव पोवार, संजय नाईक, दशरथ अमृते, विजयकुमार पाटील, निवृत्ती शेंडे, विलास नाईक, सतीश कुरुणकर, संजय कुरुंणकर, दिग्विजय घाडगे, समीर जाधव, प्रताप जाधव, गिरीश चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, पुरुषोत्तम पटेल, आशिष पटेल, नितीन पारपोलकर, सुरेश गड्डी, खोत सर, सोनू सडेकर, शिवा देवर, इर्शाद बुड्ढेखान, समीर मकानदार, अमर केंबळे, रहीम लतीफ, रौफ नसरदी, पापा लतीफ, राजेंद्र चौगुले, आसिफ काक्तीकर, इब्राहम, शिवराज सुतार, इम्रान बुडडेनार, मुबारक काकतीकर, नसरुद्दीन मुल्ला, मुख्तार काक्तिकर, अब्दुल माणगावकर, मकसूद माणगावकर, हर्षद इंचनाळकर, सलीम धालाईत, रफिक आजगेकर, अंकुश चव्हाण, शकील बेडसुरे, रफिक बेडसुरे, कुदबुद्दीन तगारे, सलीम नाईकवाडे, यासीन सर, कैफ शेख, जुबेर मुल्ला, अशीफ मुराद, रसिद्ध लाडजी, मुबारक नसरदी, बशीर शेख, मकसूद काकतीकर, विनोद जाधव, नारायण चव्हाण, संतोष भाटले, सुधाकर वंजारे, चंद्रकांत जाधव, अभिजीत येलकर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताराराणी आघाडीचा जोमदार प्रचार, उमेदवारांचा आत्मविश्वास आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता प्रभाग क्रमांक एकमध्ये निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
🟣मला सामाजिक कार्याची आवड.- अन्याय विरुद्ध लढण्याची प्रेरणा.- नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंजूर मुजावर मुलाखत. ( माझे चिन्ह कप बशी… ध्यानात मनात ठेवा कप बशी )
आजरा.- प्रतिनिधी.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणजे मुजावर सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र चॅनल मुलाखत देताना म्हणाले.
नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार आहे. मी काही वेळा आक्रमक भूमिका घेतो. याचा अर्थ मी कधीच नसतो तर मी अन्यायावरून लढतो. माझ्या शालेय जीवनात कॉलेजच्या विद्यार्थीदशेत माझा स्वभाव हाच होता. घरच्यांची गरज म्हणून मी नोकरी सोडली आणि आजऱ्यात आलो. माझे वडील मत्स्य व्यवसाय करत होते. मीही त्यांना मदत करताना कोणतीही लाज बाळगली नाही. हाजला गेलेल्या माझ्या वडीलांचा तेथेच मृत्यू झाला. त्याच पवित्र ठिकाणी त्यांचा दफनविधी झाला. यानंतर व्यवसायाची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे.

समाजसेवा करण्याची तळमळ आहे.अन्यायाविरुद्ध मी कोणत्याही प्रसंगी उभा असतो.जातपात न पहाता मी आजपर्यंत समाजसेवा केली आहे. कोरोना काळात मी माझ्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे मृत्यदेह आणून दफनविधी केले आहेत. त्यावेळी मृत पावलेली व्यक्ती कोणत्या जातीची आहे. हे कधीही पाहिले नाही. या सेवेमुळे माझा अनेक सामाजिक संस्थांनी सत्कार केला आहे. आजरा शहर हे हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन बांधव असलेले शहर आहे.कांहीवेळा तरुणांच्या मध्ये वाद होतात. पोलीसांपर्यंत हे प्रकरण जाते. यावेळी मी मध्यस्थीसाठी जातो. कारण फक्त दोन समाजामध्ये तेढ निर्माण होवू नये व तरुणांच्यावर केसीस पडू नये जेणेकरून भविष्यात त्यांना याचे नुकसान भोगायला लागू नयेत या स्वच्छ भावनेतून मी हजर असतो.माझ्या अनेक हिंदू व ख्रिश्चन बांधवांनी मला साथ दिली आहे. समाजसेवेच्या माध्यमातून मी अनेकांना मदत केली आहे.अपघात, हाॅस्पिटल, गरजूंना मदत केली आहे.
माझी पत्नी सौ.यासिराबी नगरसेविका होत्या. त्यांनीही विकास कामे केली आहेत.माझ्या कामात माझ्या कुटुंबाने मोलाची साथ दिली आहे.रात्री अपरात्री जाता येताना कधीही तक्रार केली नाही.
नगरपंचायतीच्या माध्यमातून विकास कामे झाली नाहीत.अनेक त्रुट्या आहेत. पाण्यासाठी हाल झाले. व्यवस्थापनाच्या नियोजना अभावी आजही पाणी योजना रेंगाळली आहे.रस्त्यांची तर दुर्दशा झाली आहे.

निवडणूकीत मी या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे. उमेदवारीत अनेक अडचणी आल्या मात्र त्याला भीक न घालता रिंगणात उतरलो आहे. माझ्या विरोधात प्रस्थापित आहेत. मी काँग्रेस पक्षासाठी योगदान दिले मात्र माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली नाही. मी माझ्या केलेल्या सामाजिक राजकीय कामाच्या जोरावर उभा आहे. मला निकालाची चिंता नाही. संघर्षातून उभा राहिलेला मी कार्यकर्ता आहे. घराणेशाही, प्रस्थापित यांच्या विरोधात माझा लढा हा यापुढे तीव्र असेल. मी केलेल्या कामांची पोचपावती मला जनता देईल याची मला खात्री आहे.
आजऱा शहराचा विकास साधण्यासाठी मी नक्की प्रयत्नशील असेन, पूर्णवेळ देईन.आराखडा तयार करून काम करणार नागरिकांच्या समस्या आहेत. स्वच्छ सुंदर आजरा होण्यासाठी तसेच स्वतंत्र कक्ष निर्माण करणार. अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वावात घेऊन पक्षपाप न करता काम करणार असे आवाहन अध्यक्षपदाचे उमेदवार मंजूर मुजावर यादी मतदारांना केले आहे. माझं चिन्ह हे कप बशी आहे कपबशी या चिन्हा समोर बटन दाबून मला आपले नेतृत्व करण्यासाठी विकास करण्यासाठी नगराध्यक्ष म्हणून नगरपंचायत मध्ये पाठवावे
श्री मुजावर यांचा – परिचय – मंजूर दिलावर मुजावर, शिक्षण: B.sc
नोकरी : डेक ऑफिसर, मर्चंट नेव्ही
सध्या: आजरा सामाजिक कार्यकर्ता त
भाऊ : क्लास वन अधिकारी, मर्चंट नेव्ही
पत्नी: सौ.यासिराबी लमतुरे- मुजावर , माजी नगरसेविका, आजरा नगरपंचायत
🟣मा. सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली योग्य आणि दर्जेदार विकासासाठीच – संजय भाऊ सावंत याना पाठींबा : बाफीव खेडेकर.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगर पंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामार्फत क्रमांक ४ मधून उमेदवारी मागणी केली होती. स्थानिक पक्ष नेतृत्वाने पक्षामार्फत संधी न दिल्यामुळे मी रागाने थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करून लढण्याचा निर्णय घेतला. परंतु मतविभाजनाचा फटका पक्षाला बसू नये व त्यामुळे अकार्यक्षम सत्तारूड आघाडी पुन्हा आजरेकरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून आमचे नेते मा. सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांच्या सूचनेचा आदर म्हणून मी नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माझे मित्र मा. संजयभाऊ सावंत यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असून बंटीसाहेबांच्या नेतृत्वाखालीच योग्य व दर्जेदार विकास होणार असल्यानेच हा निर्णय घेतला.
गेली आठ वर्षे मी कॉंग्रेस पक्षाचे काम अत्यंत निष्ठेने करत असून याची दखल घेऊन या निवडणुकीत पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने मला संधी देण्याची आवश्यकता होती. परंतु स्थानिक राजकारणातून मला डावलण्यात आले. या निर्णयामुळे माझ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. या सर्वांच्या दबावामुळे मी थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला होता. सत्तारुढ पक्षाला फायदा होण्यासाठी काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे लक्षात आल्यानंतर मत विभाजन होऊ शकते याची जाणीव झाली. त्यामुळे याचा फटका कॉंग्रेस पक्षाला बसू शकतो..

या बरोबरच गेल्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या भाजप प्रणीत पार्टीकडून आजन्याच्या जनतेची धोर फसवणूक झालेली आहे. एकंदर सर्वच विकासकामामध्ये सत्तारूढ नेतृत्वाने मोठे ढपले पडण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे त्याचा दर्जा शून्य झालेला आहे. कोट्यावधी रुपयांच्या पाइपलाईन योजनेमधून कोट्यावधी रुपयांचे काढलेले कमिशन, नगरसेवकांना कामे वाटून दिल्यामुळे कुंपणालाच शेत खायला देण्याचे झालेलें प्रकार या सगळ्या बाबींवर विचार केला असता सत्तारूढ आघाडी आजऱ्याच्या सत्तेपासून दूर ठेवणे हि काळाची गरज निर्माण झाली आहे.
या सर्व बाबींचा विचार करून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन व मा. सतेज पाटील साहेब यांची भेट घेऊन घेउन त्यांच्याशी चर्चा करून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारधारा असणारे माझे मित्र व सहकारी मा. संजयभाऊ सावंत यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मी प्रचारयंत्रणा सक्रीय केली होती. तांत्रिक दृष्ट्या मतपत्रिकेत माझ्या नावाचा समावेश होणार आहे. सदर प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून मी आजन्याच्या सर्व मतदारांना विनंती करतो कि सर्वांनी अन्य कोणत्याही प्रलोभनाना बळी न पडता आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेऊन शुद्ध चारित्र्याच्या व सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती असलेल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय भाऊ सावंत यांच्या’ हात’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करून सत्ताधारी भ्रष्ट आघाडीला आजरेकरांपासून दूर ठेऊया.
