Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा नगरपंचायतचा व शहराच्या विकासासाठी केवळ अशोक चराटी हेच निधी खेचून आणू...

आजरा नगरपंचायतचा व शहराच्या विकासासाठी केवळ अशोक चराटी हेच निधी खेचून आणू शकतात.- खास. धनंजय महाडिक.( पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती.)

आजरा नगरपंचायतचा व शहराच्या विकासासाठी केवळ अशोक चराटी हेच निधी खेचून आणू शकतात.- खास. धनंजय महाडिक.
( पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहराच्या विकासासाठी केंद्रात व राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या आघाडीला विजयी करणे गरजेचे आहे. कारण केंद्रात व राज्यात भाजप प्रणित आघाडीचे सरकार आहे. ताराराणी आघाडी व अशोक चराटी हे केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची जोडलेले नेते आहेत.

त्यामुळे आजरा नगरपंचायत चा व शहराच्या विकासासाठी केवळ अशोक चराटी हेच निधी खेचून आणू शकतात. त्यामुळेच शहराच्या विकासासाठी अशोक चराटी व ताराराणी आघाडी यांच्याशिवाय पर्याय नाही. असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजी मंडई येथील आयोजित सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती होते.

जाहीर सभेपूर्वी ताराराणी आघाडीच्या वतीने खासदार धनंजय महाडिक व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आजरा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

स्वागत व प्रास्ताविक करताना विलास नाईक म्हणाले, अशोकअण्णा चराटी यांना आजऱ्याच्या राजकारणात घेरण्याचे प्रयत्न नेहमी होतात मात्र नेहमीच ते अयशस्वी होतात. अशोक चराटी यांना हुकूमशहा बोलणारे गतसभागृहात चराटी यांच्या सोबतच होते. मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून अशोक चराटी यांनी आजरा शहरासाठी 80 कोटीहून अधिकचा निधी आणला. मंत्री हसन मुश्रीफ हेही आमच्या पाठीशी नेहमीच असतात सर्व समाजांचा आम्हाला पाठिंबा आहे.

खासदार धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ताराराणी आघाडीला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. काँग्रेसला या निवडणुकीत मत मागायचा अधिकार नाही. आजरा शहराचा झालेला कायापालट अशोकअण्णा चराटी यांच्यामुळे झालेला आहे. देशात, राज्यात आमची सत्ता आहे त्यामुळे ताराराणी आघाडीने दिलेला जाहीरनामा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. आजरा शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल झाला आहे त्यामुळे एक वर्षाच्या कालावधीत शहरासाठी रिंग रोड मंजूर करणार आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, सांडपाणी व्यवस्था यासाठी आगामी काळात काम करायचे आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आपण तळागाळात पोचवले आहेत. या योजनांचा लाभ देताना मुस्लिम समाजाबाबत कोणताही दुजाभाव बाळगला नाही, मग भाजप मुस्लिम विरोधी कसा? असा सवाल करत खासदार महाडिक पुढे म्हणाले, विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळत असल्याने जनतेचा आर्थिक स्तर वाढला आहे. आजरा शहराच्या विकासासाठी जे जे करायला पाहिजे ते ते करण्याची केंद्र व राज्य शासनाची तयारी आहे. देशात, राज्यात, जिल्ह्यात जसा विकास सुरू आहे, तसाच विकास आजरा शहरात होण्यासाठी शहरवासीयांनी अशोक अण्णा चराठी यांच्या पाठीशी राहावे असेही आवाहन खासदार महाडिक यांनी केले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आजरा शहरवासीयांच्या भविष्यकालीन स्वप्नांसाठी अशोकअण्णा चराटी यांना साथ द्यावी. अशोक चराटी यांच्या धडपडीमुळेच आजरा नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे शहराला विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. आगामी काळातही आजरा शहराच्या विकास कामासाठी निधी देण्यासाठी वचनबद्ध आहे.

शहरात सुसज्ज असे नाट्यगृह उभारले जाणार आहे. मुस्लिम समाजाला दोन कोटीचे सामाजिक भवन उभारून देणार आहे. रामतीर्थ पर्यटनदृष्ट्या विकसित केले जाणार आहे. शहराच्या विकासासाठी सातत्याने धडपड करणारे अशोक चराटी व त्यांची ताराराणी आघाडी यांची आजरा शहराला सातत्याने गरज आहे. शहरातील सर्व समाज आमच्याबरोबर आहेत. या सर्व समाजांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निवडणुकीतील दिलेले सर्व शब्द पुरे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून शहराच्या विकासाचे स्वप्न बाळगणाऱ्या अशोक चराटी यांना सर्वांनी साथ द्यावी असे आवाहनही पालकमंत्री आबिटकर यांनी केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, ताराराणी आघाडीची पदयात्रा बघितल्यानंतर जनता आघाडीच्या बाजूने असल्याची खात्री झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हे आजरा शहराला विकास निधी देण्यामध्ये कोठेही कमी पडणार नाहीत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक अण्णा चराटी म्हणाले, आजरा शहरातील लाडक्या बहिणींमुळे ताराराणी आघाडीची नगरपंचायतीवर सत्ता येणार आहे.

आम्ही केलेला विकास सर्वसामान्य जनतेला माहित आहे, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे त्यामुळे मुस्लिम समाज देखील 50% पाठीशी आहे. राज्याचे मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री विकास निधीबाबत माझ्या पाठीशी आहेत. खासदार महाडिक व पालकमंत्री श्री.‌ अबिटकर यांच्या माध्यमातून शहराला मोठा विकास निधी मिळणार आहे. यावेळी अबूताहेर तकीलदार, निशाद चाँद यांची भाषणे झाली.

यावेळी डॉ. दीपक सातोसकर, विजय पाटील, सुरेश डांग, रमेश कुरुणकर, जनार्दन टोपले, ज्योस्ना चराटी, अनिकेत चराटी, डॉ. आनंद गुरव यांच्यासह ताराराणी आघाडीचे सर्व उमेदवार, अण्णाभाऊ संस्था समूहाचे पदाधिकारी, आजरा शहरातील नागरिक उपस्थित होते. डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल देशपांडे यांनी आभार मानले.

लक्षवेधी महारॅली.

जाहीर सभेपूर्वी ताराराणी आघाडीची सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार धनंजय महाडिक व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आजरा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आजरा शहरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.