Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रताराराणी आघाडीची प्रभाग ५ व ६ मध्ये घरोघरी प्रचार मोहीम दमदार (...

ताराराणी आघाडीची प्रभाग ५ व ६ मध्ये घरोघरी प्रचार मोहीम दमदार ( “विकासपूर्ण आजरा आणि सर्वसमावेशक प्रशासन हीच आमची प्राथमिकता.- अशोक चराटी. )

ताराराणी आघाडीची प्रभाग ५ व ६ मध्ये घरोघरी प्रचार मोहीम दमदार ( “विकासपूर्ण आजरा आणि सर्वसमावेशक प्रशासन हीच आमची प्राथमिकता.- अशोक चराटी. )

आजरा – प्रतिनिधी.

आगामी आजरा नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडीने आज सकाळी प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मध्ये घरोघरी प्रचार फेरीचे भव्य आयोजन केले. या दौऱ्यात उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आघाडीचा प्रचार अधिक वेगाने पुढे जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सकाळच्या सत्रात झालेल्या या फेरीचे नेतृत्व ताराराणी आघाडीचे प्रमुख आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक अण्णा चराटी यांनी केले. त्यांच्या सोबत प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ. निशांत समीर चांद आणि प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ. अन्वी अनिरुद्ध केसरकर हे उपस्थित होते.


ही प्रचार फेरी मदरसा कॉलनी, मुल्ला कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी आणि एकता कॉलनी या प्रमुख वसाहतींमध्ये घेण्यात आली. नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत उमेदवारांनी आपल्या प्रभागासाठी केलेल्या योजना, सुविधा व विकास आराखडा यांची माहिती दिली. या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग विशेषत्वाने लक्ष वेधून घेणारा ठरला. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांनी उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. अनेक ठिकाणी नागरिकांनी फुलहार व शुभेच्छांद्वारे उमेदवारांचे स्वागत केले.
ताराराणी आघाडीचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांनी या प्रसंगी बोलताना, “विकासपूर्ण आजरा आणि सर्वसमावेशक प्रशासन हीच आमची प्राथमिकता आहे. नागरिकांनी दाखवलेल्या प्रेमामुळे आम्हाला अधिक बळ मिळते,” असे सांगितले.

विकास फळणीकर, डॉ. अशोक सादळे, इंजिनीयर अमोल जाधव, मनोज खाडे, मनोज बचाटे, शिवाजी सुतार, पिंटू रांगणेकर, जितेंद्र टोपले, बापू टोपले, संयोगिता बापट, भारती सर, दळवी सर, मयूर त्रिभुवने, शंकर कोरगावकर, पांडू वाकोडे, निखिल पाटील, बाबू मुल्ला, शांता शिंत्रे मॅडम, छाया चराटी, इरम चांद, बेबी आयेशा चांद, निवास सापळे, अनुप चराटी, आय के पाटील सर, तौफिक माणगांवकर, मोसीन ताकीलदार, नेसरीकर, महेश कांबळे, जियाउल माणगांवकर, सलाउद्दीन शेख, शरीफ महागोंडे, आरिफ शेख, गौस लमतुरे, इरफान नाईकवाडे, इ. प्रचार फेरीमध्ये मध्ये सहभागी झाले होते.

चौकट

🔶 आज सायंकाळचा कार्यक्रम : – प्रभाग ३ मध्ये प्रचार सभा.

आज सायंकाळी प्रभाग क्रमांक ३ मधील आमराई गल्ली व मच्छी मार्केट परिसर येथे प्रभाग फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी उमेदवार नागरिकांशी संवाद साधणार असून आघाडीचा प्रचार आणखी वेग घेण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.