🟣ताराराणी आघाडी प्रचारात.- विकासाचे ध्येय पटवून देण्यासाठी.. मतदारांच्या दारोदारी.- आजरा शहराचा विकास हाच आमचा ध्यास.
🟣 रवळनाथ कॉलनी रोड एकता कॉलनी, रोड अंधारात.- नगरपंचायतचे दुर्लक्ष.- नागरिकांची पथदिवे लावण्याची मागणी.
🟣ताराराणी आघाडी प्रचारात.- विकासाचे ध्येय पटवून देण्यासाठी.. मतदारांच्या दारोदारी.- आजरा शहराचा विकास हाच आमचा ध्यास.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत निवडणूक ताराराणी विकास आघाडीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार सिकंदर इस्माईल दरवाजकर व तारारणी आघाडीचे प्रमुख व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोकअण्णा चराटी यांच्या समर्थनार्थ प्रभाग क्रमांक दहा मधील कुंभार गल्ली व परिसरामध्ये रॅलीचे आयोजन व घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. या प्रभागामध्ये उमेदवारांच्याकडून घरोघरी प्रचार व वैयक्तिक प्रचारावर भर देण्यात आला. या प्रचार रॅलीमध्ये बहुसंख्य कार्यकर्ते व मतदार सहभागी झाले होते. आजरा शहराचा विकास हाच आमचा ध्यास पटवून देण्यासाठी आम्ही मतदारांच्या घरोघरी जाऊन आमची भूमिका पटवून देत असल्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक चराटी म्हणाले
यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष जी एम पाटील, विलासराव नाईक, विजयकुमार पाटील, जितेंद्र टोपले, डॉ. दीपक सातोसकर, वसीम दरवाजकर, शोएब दरवाजकर, वासू केसरकर, बापू पारपोलकर, मोहम्मद दरवाजकर, भरत कांबळे, प्रशांत कुंभार, बाळू कुंभार, प्रशांत कुंभार, जोतिबा कुंभार, अमोल कुंभार, प्रकाश कांबळे, संतोष कुंभार, संजय जांभळे, राजेंद्र कुंभार, सुधीर वढवलेकर, अमर कुंभार यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट.
तर सायंकाळी प्रभाग क्रमांक दहा मधील वाडा गल्लीमध्ये घरोघरी प्रचार फेरी काढत गाठीभेटी व आघाडीचे आजरा शहराचे विकासाचे ध्येय. मतदारांना समजून सांगत आमच्या आघाडीला मतदान करावे असे आवाहन. उमेदवार व ताराराणी आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले.
🟣 रवळनाथ कॉलनी रोड एकता कॉलनी, रोड अंधारात.- नगरपंचायतचे दुर्लक्ष.- नागरिकांची पथदिवे लावण्याची मागणी.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरातील काही गल्लीबोळात व काही रोडवर पथदिवे नसल्याने रात्रीच्या अंधारात पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा नाद त्रास होत आहे.
यामध्ये प्रामुख्याने रवळनाथ कॉलनी कडे जाणारा रोड व एकता कॉलनी प्रमुख मार्ग या मार्गावर सद्यस्थितीत पाईपलाईनचे काम चालू आहे रस्ता नादुरुस्त आहे.

धुळीचे साम्राज्य आहे. पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना बरेच दिवसापासून पतदिव्य नसल्यामुळे याचा त्रास होत आहे.
रवळनाथ कॉलनी रोड यावरती चार दिवसापूर्वी पाणी गळतीने हजारो लिटर पाणी वाया गेले येथील खड्डे.. पाणी याचा त्रास सहन करावा लागला परंतु काल पाण्याची गळती काढण्यात आली परंतु या ठिकाणी पडलेले खड्ड्यांमध्ये नगरपंचायतला तात्पुरता मुरूम आणून टाकता आला नाही याची खंत वाटते.

किमान या रात्रीच्या अंधारात दिवाबत्ती विभागाने येऊन पाहणी करावी.
दिवाबत्ती विभाग हा दिवसाचं काम करतो त्यामुळे रात्रीचा अंधार त्यांना दिसत नसल्याचे येथील नागरिकांचे मत आहे.
त्यामुळे येथील पथदिवे ताबडतोब लावावे. आजरा नगरपंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याने काही तक्रारदार देखील निवडणुकीच्या प्रचार जात आहेत. व आचारसंहिता असल्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबता येत नाही म्हणून आजरा नगरपंचायत प्रशासनाने अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये आजरा नळ पाणी योजनेमुळे अनेक ठिकाणी खड्डे आहेत. मुळे आजरा शहरात ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत. ची पाहणी करून पथदिवे लावावेत अशी मागणी आजरा शहरातील नागरीकांच्याकडून होत आहे.
