ताराराणी आघाडी जोरात.- आजरा शहराचा विकास हेच आमचे ध्येय.- टीका करण्यापेक्षा प्रचारात वेळ देईल.- नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक चराटी.
( उबाठा सेनेचे शहरप्रमुख ओमकार माद्याळकर, अबूसाहब तकिलदार.- यांचा ताराराणी आघाडीला पाठिंबा.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहराच्या विकासासाठी आमची आघाडी कटिबद्ध आहे. विरोधकांच्यावर टीका करण्यापेक्षा लोकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करून सर्व नगरसेवक निवडून आणणार असे पत्रकार परिषदेत अशोक सराटी बोलत होते. स्वागत विलास नाईक यांनी केले.
प्रास्ताविक विजय पाटील यांनी केले पुढे बोलताना श्री चराटी म्हणाले. आजरा नगरपंचायत निवडणुकीत चांगले उमेदवार दिलेत विरोधी आघाडीचे हूकुमशाही म्हणून अपप्रचार करत आहेत. कसली हुकुमशाही मागील कार्यकाळात सर्वांना सोबत घेऊन काम केले. तुम्ही आमच्या विरोधात सगळे एकत्र आला. पण त्याही आघाड्या बिघाड्या एकही आघाडी आपले सर्व प्रभागात उमेदवार देऊ शकल्या नाहीत.
आजरा नगरपंचायत च्या प्रशासकीय कामकाजामुळे दोन कोटी रुपये निधी परत गेला आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची प्रशासन असताना अन्याय निवारण समितीने काम केले त्यांचे कौतुक पण आरोप आमच्यावर केले हे का दोष प्रशासनाला देण्याऐवजी आम्हाला दिला. हा फक्त विरोध म्हणून.

दुसऱ्या आघाडीत मुकुंददादांना देखील फसवलं दादांच्या आजारपणाची संधी मिळाली
आमच्या आघाडीचा उमेदवारांचा प्रचार जोरात चालू आहे. जिल्ह्याचे व आमचे नेते ताराराणी आघाडीचे प्रमुख माजी आम. महादेवराव महाडिक ( आप्पा ) कदाचित शिट्टी या चिन्हाची मागणी करणार आहोत. या निवडणुकीत फक्त आपला प्रचार व विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं कोणालाही नावे ठेवणार नाही. सर्व समावेशक आमची ताराराणी आघाडी आहे. माझे जिल्ह्यातील सर्व नेत्यांची चांगली संबंध आहेत. व आजऱ्यातील मतदार मतदानाची वेळ पाहत आहेत. बटन दाबल्यानंतर नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातील उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत. असे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
आबासाहेब तकिलदार.-
राजकारणात नसणार पण अशोक आण्णाच्या सोबत असणार.

मी या निवडणुकीत उभा होतो. ते कोणाला पाडण्यासाठी नाही. पण तू माझ्यामुळे कोणाला दगाफटका होऊ नये दगा फटक्या झाल्यास आजरा शहराच्या विकासात अडचण निर्माण होईल. असे मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले तसे पाहायला गेल तर काशिनाथ अण्णा चराटी व अशोक अण्णांच्या माध्यमातून आजरा शहराला आमच्या समाजाचा सरपंच केले आहेत. मी या निवडणुकीतील माघार घेतली ती कोणाच्या सांगण्यावरून घेतली नाही अशोक अण्णा माझ्याकडे आले नाहीत. तर मी अशोक अण्णांच्याकडे आलो आहे. यापुढे राजकारणात नसणार पण अन्नाच्या सोबत असणार. असे असे श्री. तकिलदार बोलताना म्हणाले.
यावेळी जितू टोपले म्हणाले आमच्या आघाडीसोबत जिल्ह्यातील कोण नेते आहेत हे सांगण्याची गरज नाही जग जाहीर आहे. प्रचार जोरात चालू आहे नगराध्यक्षपदासह १७ प्रभागातील नगरसेवक निवडून येणार यात काही शंका नाही. असे श्री टोपले म्हणाले.
उबाठा शिवसेनेचे शहर प्रमुख ओमकार माद्याळकर –

बोलताना म्हणाले – मागील चार वर्षापासून मी नगरपंचायत निवडणुकीची तयारी करत होतो. प्रभाग क्रमांक १२ मधून मी निवडणूक लढवणार अशी चर्चा देखील आदर्श शहरात होती. येतो परंतु मला पक्षाने उमेदवारी दिली नाही. म्हणून अशोक अण्णा चराटी यांच्याकडे उमेदवारी मगितली यावेळी अनिकेत चराटी या प्रभागात उभा राहत असल्याने यावेळी त्यांच्यासोबत राहा. अशी चर्चा झाली व आजरा शहराचा विकास व्हायचा असेल तर ताराराणी आघाडी निवडून येणे गरजेचे आहे. यासाठी माझी संपूर्ण टीम या आघाडीचे काम करणार असल्याचे म्हणाले. आजरा नगरपंचायत च्या विकासासाठी मी या आघाडी सोबत नेहमीच राहणार. पण शिवसेना सोडली नसल्याचे यावेळी माद्याळकर यांनी सांगितले..

आजरा शहरातील विकास व्हावा यासाठी आम्ही अण्णा सोबत व या आघाडीला पाठिंबा दिला आहे. असे मत आकाश शिंदे, अबूसईद माणगावकर, अश्कर लष्करे, सना चाॅद, अहमदसाब तकिलदार, यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सिकंदर दरवाजकर, अनिकेत चराटी शरीफ खेडेकर, एम. डी. दरवाजकर, दिलावर चाॅद, सह आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते व पाठिंबासाठी मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते. डॉ. अनिल देशपांडे यांनी आभार मानले.

