Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रदुकानात खाऊ नेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला लज्जास्पद वर्तणुकीबद्दल.- आम. राहुल आवाडे आक्रमक.(...

दुकानात खाऊ नेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला लज्जास्पद वर्तणुकीबद्दल.- आम. राहुल आवाडे आक्रमक.( शहापूर पोलिसात बाबासाहेब बाणदार याच्यावर गुन्हा दाखल.)

दुकानात खाऊ नेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला लज्जास्पद वर्तणुकीबद्दल.- आम. राहुल आवाडे आक्रमक.
( शहापूर पोलिसात बाबासाहेब बाणदार याच्यावर गुन्हा दाखल.)

इचलकरंजी – प्रतिनिधी.

अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या लज्जास्पद वर्तणुकीबद्दल फिर्याद घेण्यास गलथानपणा व दिरंगाई करणाऱ्या शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची रविवारी आम. राहुल आवाडे यांनी चांगली कानउघडणी केली.
पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे सूर्यवंशी यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी करत आम. श्री आवाडे यांनी दोन दिवसात निलंबन न झाल्यास शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच सामाजिक संघटनांसह ठिय्या आंदोलन छेडण्याचा येईल असा इशाराही यावेळी दिला.

अल्पवयीन मुलीला कडेवर घेत तिच्या अंगाशी झटत लज्जास्पद वर्तन केल्याप्रकारणी शहापूर पोलिसात बाबासाहेब बाणदार (वय ५८ रा. तोरणानगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, बाबासाहेब बाणदार याचे घरीच किराणा दुकान आहे. दुकानात खाऊ नेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला बाणदार याने तिला घरात बोलावुन घेवुन स्वतःच्या कडेवर उचलुन घेत तिचे अंगावरुन हात फिरवुन तिचे अंगाशी झटत लज्जास्पद वर्तन केले. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी मुलीला विश्वासात घेवुन हकीकत विचारली. त्यानुसार शहापूर पोलिसांत बाणदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी फिर्याद देण्यासाठी आलेल्या पीडित मुलीच्या आईला फिर्याद न घेता दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून घेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याची माहिती मिळताच आमदार राहुल आवाडे यांनी रविवारी सकाळी थेट शहापूर पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड हेही तेथे उपस्थित होते.

त्यांच्या समक्ष आमदार आवाडे यांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची चांगलीच कानउघडणी केली. तसेच तेथे जमलेल्या विविध सामाजिक संघटना व भागातील नागरिकांनी सूर्यवंशी यांच्या कामकाजा बद्दल तक्रारींचा पाढाच वाचला. आमदार आवाडे यांनी गंभीर प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. त्यावर पोलीस उपाधीक्षक गायकवाड यांनी या संदर्भात वरिष्ठांशी बोलून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली. तर आमदार आवाडे यांनी सूर्यवंशी यांना दोन दिवसात निलंबित न केल्यास आपण स्वतः पीडिता व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी श्रीरंग खवरे, किसन शिंदे, दादा भाटले, उदयसिंग पाटील, रणजीत अनुसे, सपना भिसे, सीमा कमते, मेघा भाटले, अर्चना कुडचे, संजीवनी पाटील, बाळासाहेब ओझा, राजू भाकरे, समीर मुल्ला, नितीन कोकणे आदिसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.