वीज मीटर रीडिंग घेऊनच लाईट बील द्यावे सह – विविध मागणीचे आजरा महावितरण आजरा उबाठा सेनेचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
स्मार्ट मीटर च्या तागाद्या सोबत आता अंदाजे लाईट बिल पाठवण्याची महावितरण कंपनीने मनमानी कारभार चालू केला आहे. याबाबत आजरा ता. उबाठा शिवसेनेच्या वतीने आजरा महावितरण ला निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदन म्हटले आहे. आजरा महावितरण ने वीज मीटर रीडिंग घेऊनच लाईट बील द्यावे. व अंदाजे बील देऊ नये तसेच ग्राहकाला पूर्व कल्पना देण्याआधी कनेक्शन कट करू नये
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपणास निवेदन देतो कि, आजरा तालुक्यातील नागरिकांना आपल्या विभागाकडून घरगुती कनेक्शनची वीजबील हि मीटर रीडिंग घेण्या अगोदरच अंदाजे दुप्पट रकमेची वीज ग्राहकांना दिली जात आहेत. त्यामुळे जि जुनी मीटर आहेत. त्याची लाईट बिले हि मीटर रीडिंग घेतल्याशिवाय देऊ नयेत तसेच आपल्या विभागाकडून सध्या मेंटेनन्स साठी व वसुलीसाठी वेगवेगळी टीम नेमलेली आहे. त्यावेळी एखाद्या घरातील वीज बंद होते त्यावेळी आपले कर्मचारी ऑनलाईन तक्रार करा मगच आम्ही दुरुस्ती करू असे सांगतात त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाइन तक्रार करणे वेळेवर जमत नाही तर काही ग्रामीण भागातील ग्राहकांना ऑनलाईन तक्रारच करता येत नाही त्यामुळे वयोवृद्ध त्यांना रात्रभर अंधारात राहावे लागते. तसेच वसुलीचे पथक हे किरकोळ ५०० रुपये थकीत असणाऱ्या ग्राहकांचे कलेक्शन कस सांगून लगेच उडत्या ग्राहकाला सूचना देतो डांबा वरूनच कनेक्शन बंद करतात.

त्यामुळे सदर ग्राहकाला बील भरूनही दुसऱ्या दिवसापर्यंत वाट बघावी लागते. हे सर्व अन्यायकारक आहे. तरी वरील मागण्याचा तात्काळ विचार होऊन यावर तोडगा काढावा अन्यथा आपल्या कार्यालयावर जन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील ता. प्रमुख युवराज पोवार, विभाग प्रमुख दिनेश कांबळे, सह अमित गुरव, प्रकाश गुडळकर, शाखा प्रमुख संजय सावंत यांच्यासह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
