ग्रामीण भागातील ट्रॅक्टर – चालक मालक शेतकऱ्यांना – मजबूत कॅनमधून डिझेल / पेट्रोल द्यावे.
( आजरा तालुका सरपंच संघटना. वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन.)
आजरा.- प्रतिनिधी.
मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे पेट्रोल पंपापर कॅनमधून डिझेल, व पेट्रोल देणे बंद केले याबाबत. आजरा तालुका सरपंच संघटना, व मडिलगे ग्रामपंचायत ट्रॅक्टर जेसीबी, पावर टेलर, मळणी मशीन, ग्रास कटर चालक – मालक संघटना वतीने यांच्या वतीने सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष मडिलगे सरपंच बापू निऊगरे यांच्या नेतृत्वाखाली आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मा. जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील सर्वच पेट्रोल पंप धारकांना कोणालाही डिझेल व पेट्रोल कॅन व बॉटल मधून देऊ नये असे आदेश देण्यात आलेले आहेत. या आदेशाचा आम्ही आदर करतो. परंतु ग्रामीण भागातील शेतकरी व ट्रॅक्टर चालक मालक जेसीबी वाहने ज्या शेतकऱ्यांचे आहेत त्यांना आपले वाहन बंद पडल्यास कॅनमधून डिझेल व पेट्रोल आणावं लागतं यामध्ये काही भात कापणी मशीन पेट्रोलवर चालतात यामुळे ती मशीन घेऊन येणे अशक्य असतं यामुळे मजबूत प्लास्टिक कॅन मधून डिझेल व पेट्रोल द्यावे अशी आम्ही आपल्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करत आहोत.

या मागणीची दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यावी. व आपली भूमिका व आपला घेतलेला निर्णय योग्य आहे. परंतु अशी कोणतीही घटना घडू देणार नाही. आम्ही शेतकरी बांधव ट्रॅक्टर मालक चालक हे मजबूत प्लास्टिक कॅन मधून डिझेल व पेट्रोल घेऊन जाऊ यासाठी आम्हाला आपल्या सहकार्याची. गरज आहे. आपल्या आदेशाने अनेक पंपावरती सूचनेचे पालन केले जात नाही. त्यामुळे आमची अडचण निर्माण झाली आहे.

तरी आपला निर्णय योग्य आहे परंतु आम्हाला सहकार्य मिळावे अशी मागणी आम्ही करत आहोत. निश्चितमणे आपले सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो. अशी निवेदनाद्वारे विनंतीपूर्वक मागणी केली आहे.
या निवेदनावर सरपंच संघटनेचे महिला आघाडीचे अध्यक्ष शुषमा पाटील, सरपंच सदस्य भारती डेळेकर, सरिता पाटील, कल्पना डोंगरे, महादेव दिवेकर, विजया गुरव, सह सर्व सरपंच सदस्य यांच्या सह्या आहेत.
