Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुकुंद दादा देसाई यांचा आज वाढदिवस. ( कामानिमित्त...

शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुकुंद दादा देसाई यांचा आज वाढदिवस. ( कामानिमित्त बाहेरगावी असल्याने शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित नसतील हितचिंतकांनी नोंद घ्यावी.)🛑हालेवाडी ते उत्तूर रस्ता खड्डेमुक्त करावा.- कॉम्रेड शिवाजी गुरव🟣आजरा नगरपंचायत च्या रणधुमाळीत तिसऱ्या आघाडीची एन्ट्री..अन्याय निवारण समिती.- भाजप एकत्र.- आमचीच खरी भाजप.

🟣शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष. संयमी नेतृत्व – मुकुंद दादा देसाई यांचा आज वाढदिवस. ( कामानिमित्त बाहेरगावी असल्याने शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित नसतील हितचिंतकांनी नोंद घ्यावी.)
🛑हालेवाडी ते उत्तूर रस्ता खड्डेमुक्त करावा.- कॉम्रेड शिवाजी गुरव
🟣आजरा नगरपंचायत च्या रणधुमाळीत तिसऱ्या आघाडीची एन्ट्री..अन्याय निवारण समिती.- भाजप एकत्र.- आमचीच खरी भाजप.

🟣शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुकुंद दादा देसाई यांचा आज वाढदिवस. ( कामानिमित्त बाहेरगावी असल्याने शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित नसतील हितचिंतकांनी नोंद घ्यावी.)

आजरा.- प्रतिनिधी

आजरा तालुक्याचे दिवंगत लोकनेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्व. बळीराम देसाई यांच्या राजकीय, साामाजिक व सहकार क्षेत्रांतील नावलौकिक असणारी जनता बँक स्थापन केली व अनेक संस्थांचे जाळे विणले या सहकाऱ्याच्या जाळीला पुढे चांगल्या पद्धतीची वाटचाल ठेवली व राजकीय व सामाजिक क्षेत्रात मुकुंददादा देसाई यांची वाटचाल सुरू आहे. सद्यस्थितीत स्व. बळीराम देसाई यांच्या पश्चात जनता बँकेची धुरा ताब्यात घेऊन बँकेला मोठा नावलौकिक मिळवून दिला आहे. बँकेच्या कामकाजामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन सभासद व ग्राहक समाधानकारक सेवा देत आहेत.‌

त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बँकेला राज्यस्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. बँकेच्या ६० वर्षांच्या इतिहासात २०२३ मध्ये बँकेची निवडणूक बिनविरोध करून तालुक्यातील सहकार क्षेत्रात विश्वासात पात्र राहिले
सहकारात आपल्या कामाचा ठसा मुकुंददादा देसाई हे उमटवत असताना लोकांनी त्यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काम करत असताना त्यांनी काम केले आहे. सध्या ते वसंतराव देसाई साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.

🛑हालेवाडी ते उत्तूर रस्ता खड्डेमुक्त करावा.- कॉम्रेड शिवाजी गुरव

आजरा.- प्रतिनिधी.

हालेवाडी ते उत्तूर रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत यामुळे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे अपघात होत आहेत हा रस्ता खड्डेमुक्त करावा. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.हालेवाडी ते पेंढारवाडी या ठिकाणी अति जास्त खड्डे आहेत.
यामध्ये सोबत रस्त्यावर मारलेले पांढरे पट्टे या पांढऱ्या पट्ट्यांच्या मध्ये भेगा पडलेल्या आहेत. या मार्गावरील पडलेले खड्डे ताबडतोब डागडुजी करून मुजवून घ्यावे. अन्यथा उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यासमोर आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आजरा नगरपंचायत च्या रणधुमाळीत तिसऱ्या आघाडीची एन्ट्री..अन्याय निवारण समिती.- भाजप एकत्र.- आमचीच खरी भाजप.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत निवडणुकीत काल ताराराणी आघाडीची घोषणा झाली. तर दुसऱ्या आघाडीत चालू असलेल्या घडामोडीतून बाहेर पडून अन्याय निवारण समिती व भाजप यांनी तिसरी आघाडीची नगराध्यक्ष पदाची घोषणा केली अन्य १७ प्रभागातील उमेदवार या नावाची यादी लवकरच करणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी बोलताना अरुण देसाई म्हणाले मागील कार्यकालत सत्ता असताना नगरपंचायत च्या माध्यमातून भ्रष्टाचार मांडला होता. यानंतरच्या काळात आजरा शहरातील नागरिकांच्या अडचणीला तोंड देण्याचे काम अन्याय निवारण समितीने केले आहे. यावेळी एकही माजी नगरसेवकाने त्यांच्या अडचणी कडे फिरकून देखील पाहिले नाही. यासाठी या निवडणुकीतून चांगले चेहरे निवडून आणून आजरा शहराला नवी दिशा देण्याचे काम करणार आहोत. जे नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील खरी भारतीय जनता पार्टी म्हणजे आम्ही आहोत. यामुळे हजरत शहरातील सुद्धा नागरिक आमच्या पाठीशी राहतील अशी असे बोलताना म्हणाले.

यावेळी प्रा. सुधीर मुंज म्हणाले अन्याय निवारण समितीने मागील दोन वर्षात जनतेच्या मदतीसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. व जनतेच्या आग्रहास्तव या आघाडीची स्थापना झाली आहे. डॉ. श्री ठाकूर सामाजिक कामा त त्यांचा नेहमीच पुढाकार असतो त्यांच्या नावाला कोणताही कलंक नाही आजरा शहराला वाईट वळण देण्याचे काम काही मंडळींनी केल आहे. अशा लोकांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी या गाडीची स्थापना झाली असल्याचे श्री मुंजी यांनी सांगितले.
यावेळी डॉ. श्री ठाकूर म्हणाले समोरील आघाडीतील नेत्याला जनतेने व वरिष्ठ नेत्यांनी देखील डावल्ले आहे. नितीमता घसरत चालली आहे आधाराला सगळे पक्ष – खायला एकटे, तर आम्ही कर भरायचा तर तुम्ही घर चालवायचे आपल्याकडे संस्था व जनता आहे म्हणून सर्व काही आहे असं नाही. आपले चिन्ह बाजूला ठेवून भाजपचे कार्यकर्ते या आघाडीत आले आहेत. कारण की आघाडी सर्वसामान्य जनतेची आहे असे डॉ. श्री ठाकूर म्हणाले.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर, तसेच भाजपचे प्रा. सुधीर मुंज, अरुण देसाई, नाथ देसाई, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य, भाजपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.