दिनकर कातकर यांचे दुःखद निधन.. हाडाचा शेतकरी – चिखलगुट्टा शर्यती मंडळचा अध्यक्ष.
आजरा.- प्रतिनिधी.
मडिलगे ता. आजरा येथील दिनकर गणपती कातकर वय वर्ष ६६ यांचे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
बैल जोडी आणि बैलगाडी यासोबत शेती करणारा हाडाचा शेतकरी, यासोबत चिखलगुट्टा शर्यतीची आवड असणारे, राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने ते अग्रेसर होते.
दरम्यानच्या काळात वयाच्या मानाने आजारी पडले व अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात, विविहीत दोन मुली एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्या शामल कातकर यांच्या सुनबाई होत.
