आजऱ्यात भाजप, शिंदे सेना गट पुरस्कृत.- ताराराणी आघाडीच्या उमेदवाराची घोषणा.- आजरा नगरपंचायत च्या रणधुमाळला सुरुवात
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी – शिवसेना शिंदे गट पुरस्कृत ताराराणी आघाडीचे उमेदवार छाननी व माघारच्या पूर्वीच जाहीर करण्यात आल्यामुळे आजरा शहरात चर्चा जोरात सुरू आहे. यावेळी आघाडी प्रमुख नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक चराटी, तसेच विलास नाईक, सुरेश डांग, विजय पाटील, रमेश कुरुणकर, आनंदा फडके, संजय चव्हाण, अनिरुद्ध केसरकर, संजय सावंत यांच्यासह सर्व उमेदवार आघाडीचे कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक चराटी म्हणाले, दिलेला शब्द पाळणारी ही आघाडी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यातून निवडणुकीला सामोरे जात आहे. आमच्या आघाडीत बहुसंख्य मुस्लिम गटांचा देखील पाठींबा आहे. मागील पाच वर्षाच्या कालावधीत आम्ही शहराच्या विकासासाठी काम केले आहे. परंतु नगरपंचायत कालावधी संपल्यानंतर प्रशासन नेमण्यात आले या काळात मंजूर झालेल्या कामे व्यवस्थित रित्या केली नाहीत. व हा सर्व दोष व टीका आमच्यावर करण्यात आल्या. मुळात नगरपंचायत चा कालावधी संपल्यानंतर त्या विकास कामांशी हस्तक्षेप करण्याचा आम्हाला अधिकार नव्हता. आजही नळ पाणी
योजनेनंतर रस्त्याची खुदाई करण्यात आली. सदर सिमेंटचे रस्ते त्याचे काम आघाडीवर सुरू आहे. लवकरच आजरा शहरातील सर्व रस्त्यांचे काम पूर्ण होईल यापुढेही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे आमचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे बोलताना श्री चराटी म्हणाले.

ताराराणी आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे
नगराध्यक्ष : अशोक काशिनाथ चराटी
प्रभाग १ : अश्विनी संजय चव्हाण
प्रभाग २ : पूजा अश्विन डोंगरे
प्रभाग ३ : समीना वसीम खेडेकर
प्रभाग ४ : रशीद महंमद पठाण
प्रभाग ५ : निशात समीर चाँद
प्रभाग ६ : अन्वी अनिरुद्ध केसरकर
प्रभाग ७ : बालिका सचिन कांबळे
प्रभाग ८ : इकबाल इब्राहिम शेख
प्रभाग ९ : यास्मिन कुदरत लतीफ
प्रभाग १० : सिकंदर इस्माईल दरवाजकर
प्रभाग ११ : गीता संजय सावंत
प्रभाग १२ : अनिकेत अशोक चराटी
प्रभाग १३ : परेश कृष्णाजी पोतदार
प्रभाग १४ : सिद्धेश विलास नाईक
प्रभाग १५ : शैलेश नारायण सावंत
प्रभाग १६ : आसावरी महेश खेडेकर
प्रभाग १७ : पूनम किरण लिचम
विजय पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक व उमेदवारांच्या नावाची घोषणा केली विलास नाईक यांनी आभार मानले.

