Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रजिल्ह्यात - पेट्रोल/डिझेल पंप चालकांना - बाटल्या, कॅन मधून - विशेषतः इंधन...

जिल्ह्यात – पेट्रोल/डिझेल पंप चालकांना – बाटल्या, कॅन मधून – विशेषतः इंधन साठवण्यासाठी देऊ नये.- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश योग्यच. ( पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची समस्या समजून घ्यावी.- शेतकऱ्यांची मागणी )

जिल्ह्यात – पेट्रोल/डिझेल पंप चालकांना – बाटल्या, कॅन मधून – विशेषतः इंधन साठवण्यासाठी देऊ नये.- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश योग्यच. ( पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची समस्या समजून घ्यावी.- शेतकऱ्यांची मागणी )

आजरा.- प्रतिनिधी.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल / डिझेल पंप चालकांना सूचित करण्यात येते की, बाटल्या, कॅन (जे विशेषतः इंधन साठवण्यासाठी प्रमाणित केलेले नाहीत), किंवा तत्सम कोणत्याही असुरक्षित व अप्रमाणित कंटेनरमधून इंधनाची (पेट्रोल/डिझेल) विक्री आणि वितरण करणे हे ज्वलनशील पदार्थांच्या वाहतूक आणि साठवणुकीच्या सुरक्षा नियमांनुसार अत्यंत धोकादायक आणि पूर्णपणे निषिद्ध आहे.

या धोकादायक प्रथेमुळे आग लागणे, स्फोट होणे, अपघात घडणे, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात येते.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल/डिझेल पंप चालकांनी खालीप्रमाणे दक्षता घेणेत आली आहेत यामध्ये. सदर आदेश योग्य आहेत परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची समस्या समजून घ्यावी. अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्याकडून होत आहे.
जिल्हाधिकारी यांची म्हणणे पुढील प्रमाणे

१) तात्काळ बंदीची अंमलबजावणीः- जिल्ह्यातील आपल्या अखत्यारीतील सर्व पेट्रोल/डिझेल पंपांवर बाटलीतून किंवा इतर असुरक्षित कंटेनरमधून इंधन विक्री पूर्णपणे थांबवण्याची तातडीने आणि कडक अंमलबजावणी करावी.
२) विक्री अधिकाऱ्यांची जबाबदारीः आपण आपल्या क्षेत्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर भेट देऊन, या नियमाचे उल्लंघन होत नाहीये याची खात्री करावी.
३) नियमांचे उल्लंघनः नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही पेट्रोल पंप चालकास तातडीने कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावावी आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. यात परवाना रद्द करण्याची शिफारस देखील समाविष्ट असेल.
४) जनजागृतीः पेट्रोल पंप चालकांनी पंप परिसरात याबाबत स्पष्ट सूचना प्रदर्शित कराव्यात. तरी यापुढे पेट्रोल पंपावर आपलेमार्फत बाटलीतून पेट्रोल देणे तात्काळ बंद करावे अन्यथा बाटलीतून पेट्रोल विक्री केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करणेत येईल याची नोंद घेणेत यावी. असे आदेश जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आले असल्याने जिल्ह्यातील कोणत्याही पंपावर नियम पाळले जात आहेत. पेट्रोल किंवा डिझेल
बाटलीतून पेट्रोल किंवा कॅन मधून देणे तात्काळ बंद केले आहे.

यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी भाताची मळणी सोडून पंपावर उभा आहे. सद्यस्थितीत सुगीचे दिवस आहेत. एकीकडे अतिवृष्टीमुळे व वन्यप्राण्यामुळे हातात तोंडाला आलेला घास घरी आणण्याच्या गडबडीत शेतकरी आहेत. दुसरीकडे ऊसतोड चालू आहे उसाची वाहतूक ट्रॅक्टर ट्रक करत आहेत. या वाहनांचे डिझेल संपल्यास अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील, शेतकऱ्यांची व नागरिकांची मागणी आहे. की एखादी गाडी बंद पडली असेल तर पेट्रोल किंवा ट्रॅक्टर बंद असेल तर डिझेल कसे घेऊन जावे. शेतकऱ्यांसाठी आपल्या या नियमात बदल करावा. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.‌ आपली भूमिका योग्य आहे परंतु आमच्या समस्या समजून घेऊन मजबूत प्लास्टिक कॅन मधून आम्हाला डिझेल देण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी शेतकरी व जेसीबी, ट्रॅक्टर चालक-मालक करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.