तालुक्याच्या विकासासाठी धडपडणारे नेतृत्व अशोकअण्णा.- प्रा. अर्जुन आबिटकर.
( आजरा नगरपंचायत निवडणूक साठी जाहीर पाठिंबा.)
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्याच्या विकासासाठी धडपडणारे नेतृत्व म्हणजे अशोकअण्णा चराटी होय. पालकमंत्री. नाम. प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून आजरा नगरपंचायत स्थापनेची सुरुवात झाली. व लाखाचा नाहीतर कोट्यावधीचा निधी आजरा नगरपंचायतला व मतदारसंघाला मिळाला. असे मत अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त अध्यक्ष स्थानावरून जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर बोलत होते. स्वागत डॉ. अनिल देशपांडे यांनी केले. प्रास्ताविक विजयकुमार पाटील यांनी केले.

पुढे बोलताना प्रा. श्री. आबिटकर म्हणाले अण्णा तालुक्याच्या विकासाची कामे हाती घेतात वेगवेगळ्या नेत्यांच्या कडे जाऊन त्या कामाचा पाठलाग करतात अजूनही वेगवेगळी कामे हाती घेतले आहेत. नाट्यगृह, गार्डन, आजरा शहरातील सिमेंट रस्ते विकास कामे चालू होणार आहेत. या विकास कामासाठी अण्णांची धडपड ही समाजासाठी आहे. होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अण्णांना व सर्व आघाडीला आपला पाठिंबा असल्याचे वाढदिवसानिमित्त प्रा. श्री आबिटकर यांनी शुभेच्छा देऊन मत व्यक्त केले.

यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक म्हणाले आजरा नगरपंचायत चे होऊ घातलेल्या निवडणुकीतील नगराध्यक्ष हे अशोकअण्णा असतील आघाडी बाबत निवडणूक चित्र स्पष्ट झाले आहे. कारण अशोक अण्णा हे. चिरतरूप व्यक्तिमत्व व अण्णाभाऊ संस्था समुहाचा रथ चांगल्या रीतीने पुढे घेऊन जाणारे सर्वसामान्य जनतेला सोबत घेणारे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे.

महायुतीच्या माध्यमातून आजरा शहराचा विकास होत आहे. यापुढेही होणार आहे. तसेच संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्ग गडहिंग्लज व आजरा हा बायपास करण्यासाठी व बाहेरील वाहनांचा आजरा व गडहिंग्लज शहरात होणारा. त्रास थांबवण्यासाठी बायपास रस्ता करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. आजरा नगरपंचायत मध्ये होणाऱ्या निवडणुकीत अशोकअण्णा जो जाहीरनामा प्रसिद्ध करतील त्या जाहिरातीतील सर्व मागण्या महायुती पूर्ण करेल अशी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त खास. श्री. महाडिक बोलताना म्हणाले.

यावेळी वाढदिवसाच्या सत्काराला उत्तर देताना अण्णाभाऊ संस्था समोरचे प्रमुख अशोकआण्णा चराटी म्हणाले आजरा शहरासह आजरा तालुक्यातील व जिल्ह्यातून माझ्या वाढदिवसानिमित्त संख्येने उपस्थित राहिला मन भारावून गेले. मागील आजरा नगरपंचायत च्या कार्यकाळात पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून आजरा शहराला भरघोस निधी मिळाला आजरा नगरपंचायत चा कार्यकाल संपला व प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीने विकास काम होण्यास विलंब झाला. काही वेळा चुकीची कामे झाली. व हा सर्व दोष आमच्यावर लादला गेला. परंतु प्रशासन असल्यामुळे आम्ही या कामात हस्तक्षेप करू शकत नव्हतो. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आजरा शहराचा विकास करायचा आहे. लवकरच २२ कोटीचा आजरा शहरातील सिमेंट रस्ते यासाठी निधी मंजूर झाला आहे. मतदारांनी मतदानाला जाताना या नव्या रस्त्यावरून जावं यासाठी जलद गतीने कामे करण्यास सुरुवात होणार आहे.

आमच्या आघाडीची भूमिका व उमेदवार आज किंवा उद्या आम्ही जाहीर करत आहोत परंतु नगराध्यक्ष पदासह एक जागा वगळता सर्व जागावर आमची आघाडी विजय होईल. नाट्यगृहासाठी सात कोटी मंजूर झाले आहेत. एक गार्डन झाली आहे अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी गार्डन मंजूर मिळण्यासाठी प्रयत्नशील आहोत. प्रचाराचा कालावधी कमी आहे. आजरा शहरातील भगिनींनी व सर्व मतदारांनी आमच्या आघाडीची पाठीशी राहावे वाढदिवसानिमित्त भूमिका व्यक्त केली. या वाढदिवस कार्यक्रम सोहळ्यासाठी अण्णाभाऊ संस्था समूहाचे सर्व संस्थेचे चेअरमन व्हा. चेअरमन संचालक, आजरा शहर व तालुक्यातील अण्णाभाऊ गटाचे सदस्य हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विलास नाईक यांनी मानले
अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा शहर व तालुक्यातील नागरिकांची, तसेच जिल्ह्यातील नेत्यांची उपस्थितीत.. शुभेच्छांचा वर्षाव..
