Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल.( नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी...

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल.( नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी चार )

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल.
( नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी चार )

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १० तारखेपासून अर्ज दाखल करण्याची सुरुवात होती. परंतु यामध्ये तांत्रिक व राजकीय अडचणी येत होत्या. या काही प्रमाणात सुखर होत आहेत.

आज गुरुवार दि. १३ रोजी चौथ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी चार असे एकूण सात अर्ज दाखल झाले आहेत. पहिल्या तीन दिवसात एकही अर्ज दाखल झाला नव्हता.

आज गुरुवारी नगराध्यक्ष पदासाठी मंजूर मुजावर, अंजीरेआलम आबूताहेर तकीलदार, अमानुल्ला आगलावे तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक ३ मधून सुमैय्या खेडेकर, प्रभाग ६ मधून साधना मुरुकटे, प्रभाग १२ मधून समीर गुंजाटी तर प्रभाग १४ मधून सूर्यकांत नार्वेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. अशी अधिकृत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आजरा तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

चौकट

उद्या शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्याची संख्या व पॅनल रचना पूर्ण होण्याची शक्यता आहे. उद्यापासून उमेदवारांची ऑनलाइन अर्ज दाखल व ऑफलाईन देण्याची धांदल उडणार आहे. परंतु आज देखील कोण कोणत्या आघाडीत आहे. हे चित्र स्पष्ट होताना दिसत नाही. उद्यापर्यंत आघाडी व कोणकोणत्या आघाडीत कोणकोणते नगरसेवक आहेत. सर्वरडाऊन मुळे इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल होण्यासाठी त्रास होत आहे. याबाबत देखील निवडणूक आयोगाने विचार करून आपल्याला अर्ज घेण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.