आधाराची भिंत – समाज हितासाठी काम करणारे व्यक्तीमहत्व म्हणजे सामाजिक कार्यकर्ते.- संजय केसरकर.
( भादवण पंचायत समिती लढवावी.- सौ साधना केसरकर यांना संधी द्यावी.)- { जिंकायचं कसं ठरलंय लढवायची तयारी ठेवा.- उपस्थितांची घोषणा.}
आजरा.- प्रतिनिधी.

आधाराची भिंत, बेरजेचे समाज कारण करत समाज हितासाठी काम करणारे आगळं – वेगळं व्यक्तीमहत्व म्हणजे सामाजिक कार्यकर्ते. संजय केसरकर आज
वाढदिवस म्हणजे हि माणसांची गर्दी नाही. आपुलकी ने जवळ आलेली माणसातील माणसं आहेत. अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

यावेळी माजी शिक्षण अधिकारी आनंदराव जोशीलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले भादवण गावांसह विभागातील केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आम्ही ग्रामस्थ यांनी त्यांचा गौरव व वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक परिस्थिती त्यांच्या कार्यामुळे लाभली आहे. भादवण गावातून एकच उमेदवार देऊन एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय आमचा झाला आहे असे श्री. जोशीलकर म्हणाले.
यावेळी जयवंत सुतार म्हणाले तुमच्या मनातील संकल्प पूर्ण होईल तुमच्या मागे जनता आहे. गावातील सर्वांची एकत्र येण्याचे ठरवले आहे. तर सौ केसरकर यांना पुढे येण्याची संधी द्यावी.
गोकुळचे माजी कर्मचारी संजय सावंत भादवण गावाला संधी आहे. तालुक्याचे प्रथम नागरिक व्हा. योग्य संधी, मान मिळाल्यास निर्णय घेऊया. १००% लढणार व साथ देणार श्री सावंत म्हणाले.
संभाजी बापट म्हणाले. पंचायत समिती लढवावी आम्ही आपल्या पाठीशी आहोत. जिंकायचं कसं ठरलंय लढवायची तयारी ठरवा.
सरपंच सौ गाडे, श्री गाडे यांनी वाढदिवसाच्या व सौ केसरकर यांना भादवण पंचायत समिती साठी शुभेच्छा देत भादवण गावचा सदस्य तालुक्याचा प्रथम नागरिक व्हावा असे मत व्यक्त केले.
कारखाना संचालक हरिभाऊ कांबळे गोरगरीब जनतेसाठी लढणारा कार्यकर्ते संजय केसरकर सामान्य माणूस ते राजकीय सामाजिक कार्यकर्ता
आहे.. कविता सादर.. मित्र असावा गोरगरिबांना मदत करणार .. मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा अशी कविता सादर केला. कारखाना माजी संचालक बी. टी. जाधव यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सौ केसरकर यांना भादवण पंचायत समिती ताकतीने लढवावी आम्ही आपल्या पाठीशी अहोत असे सांगितले. सुनिल डोंगरे यांनी वाढदिवसाच्या व श्री सौ नाही राजकीय शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

संजय केसरकर.- वाढदिवसाच्या शुभेच्या ला उत्तर देताना म्हणाले
पंचायत समिती पाळ मुळे रोवली ती १३ वर्षांपूर्वी पंचायत समिती लढवण्याची तयारी केली. त्यावेळी तीनशे मोटरसायकल घेऊन नेत्यांच्या कडे मागणी केली. पण मी त्यावेळी मी काही कारणास्तव माघार घेतली होती.
पण त्यावेळचे व आजचे माझे सर्व मित्र परिवार यांनी मला आज होऊ घातलेल्या पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक लढवण्यासाठी परवानगी दिली आहे.
माझ्या विभागाचा व गावचा विचार करेल त्याचा विचार करुया. असे मला उमेदवारी लढव म्हणणारी माझे सवंगडी यांनी सल्ला दिला आहे. सर्वांचे प्रेमापोटी व आशीर्वादाने भादवण पंचायत समिती सौ साधना केसरकर लढवणारच असे संजय केसरकर म्हणाले.

माजी जि. प. अध्यक्ष – उमेश आपटे – त्यांच्या मनात जे काही ते आहे. ते पुर्ण होऊ. हात – हातात धरा पण पाय कोणाचे धरु नका. उपरात्मक सल्ला दिला.
औक्षण करून केक कापून वाढदिवसाच्या व भावी राजकीय सामाजिक वाटचालीस उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या वाढदिवस कार्यक्रमासाठी. श्रीमती धोंडुबाई केसरकर, सुभाष पाटील, पी. आर. जोशीलकर, विजय माने, रवींद्र भाटले, युवराज जाधव, भास्कर निकम, विभागातील काही सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, श्री. देसाई, सौ. साधना केसरकर, सह भादवण ग्रामस्थ सह तालुक्यातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. श्री डेळेकर सर यांनी सुत्रसंचलन केले सौ. केसरकर यांनी आभार मानले.

