🟣तिरुपतीच्या धरतीवर पंढरपूर वारकऱ्यांना सभा मंडप चा लाभ घेता येणार.- कमी वेळेत विठुराया – माऊलीचे होणार दर्शन.- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🟣राज्यातील जिल्हा बँकेतील नोकर संचालकांच्या मर्जीला शासनाने घातला आवर.- आता ऑनलाइन पद्धतीने
🛑तिरुपतीच्या धरतीवर पंढरपूर वारकऱ्यांना सभा मंडप चा लाभ घेता येणार.- कमी वेळेत विठुराया – माऊलीचे होणार दर्शन.- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर :- एस. सतिश

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्या याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने १३० कोटीचा निधी मंजूर केलेला होता. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून प्रशासनाने हे काम अत्यंत जलद गतीने पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सुविधा सुलभ व कमी वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कार्तिकी यात्रा २०२५ च्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खा. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंढरपूर येथे आषाढी व कार्तिकी वारीमध्ये लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शन रांगेत चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन मंडप काम गतीने होणे गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केलेले असून वारकऱ्यांना लवकर दर्शन मिळत आहे. कारण वारकरी हाच व्हीआयपी असल्याचे त्यांनी सांगून वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने चांगले नियोजन केले असल्याचे सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विविध कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
🟣राज्यातील जिल्हा बँकेतील नोकर संचालकांच्या मर्जीला शासनाने घातला आवर.- आता ऑनलाइन पद्धतीने
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यातील जिल्हा बँकेतील नोकर भरतीतील संचालकांच्या मर्जीला शासनाने आवर घातला आहे. यापुढे नोकर भरतीची प्रक्रिया शासनाने शिफारस केलेल्या तीनपैकी एका संस्थेच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, असा आदेश सहकार विभागाने दिला आहे. ७० टक्के स्थानिकांना संधी बँकांचे हित जोपासण्यासाठी स्थानिक जिल्ह्यातील ७० टक्के उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. ३० टक्के उमेदवार अन्य जिल्ह्यातील असतील.
जळगाव जिल्हा बँकेने काही दिवसांपूर्वी काढलेल्या कंत्राटी नोकर भरतीच्या जाहिरातीत कला शाखेच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आल्याने नाराजीची भावना निर्माण झाली होती. त्यानंतर जळगाव जिल्हा बँकेतील नोकर भरतीवरून गेल्या काळात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले आहे. बँकेचे संचालक व आमदार एकनाथ खडसे यांनी नोकर भरती पारदर्शकपणे व्हावी यासाठी शासनाकडून नियुक्त केलेल्या कंपनीमार्फत नोकर भरती करण्याची मागणी केली होती.
३१ जिल्हा बँकेत भरती सुरू
बँकांमध्ये रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यवतमाळ जिल्हा बँकेत १३३ रिक्त पदे आहेत. त्याचबरोबर जळगाव २२०, ठाणे १२३ आणि राज्य सहकारी बँकेत १६७ रिक्त पदे आहेत.
या संस्थांची शिफारस
भरती प्रक्रियेसाठी सहकार विभागाने तीन संस्थांची शिफारस केली आहे. या प्राधिकृत केलेल्या तीनपैकी एका संस्थेमार्फतच ही नोकर भरतीची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

