Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवन हक्क संघर्ष समितीचे आजऱ्यात गुरुवारी ठिय्या आंदोलन. ( मुख्य वनरक्षक यांच्याशी...

वन हक्क संघर्ष समितीचे आजऱ्यात गुरुवारी ठिय्या आंदोलन. ( मुख्य वनरक्षक यांच्याशी बैठकीची प्रमुख मागणी. पत्रकार परिषदेत माहिती. )

वन हक्क संघर्ष समितीचे आजऱ्यात गुरुवारी ठिय्या आंदोलन. ( मुख्य वनरक्षक यांच्याशी बैठकीची प्रमुख मागणी. पत्रकार परिषदेत माहिती. )

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा वनविभाग सत्ताधारी पक्षातील गटाच्या पदाधिकारी यांसोबत बैठक घेऊन चर्चा करते ही चर्चा खरंतर शेतकरी – व जनतेसोबत झाली पाहिजेत आम्ही वेळोवेळी मागणी करत असताना ही बैठक घेतली जात नाही. त्यामुळे वनविभाग सत्ताधारी गटाच्या बाजूने निर्णय घेत वनविभाग संवाद पलीकडे गेली असल्याचे स्पष्ट होते.

यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारले पाहिजेत पालकमंत्री हे जनतेचे आहेत. एका गटाचे नाहीत. सर्व जनतेसोबत वनविभागाने मुख्य वनरक्षक यांच्याशी बैठक घ्यावी.

याबाबत महाविकास आघाडीचे घटक पक्ष व वन हक्क संघर्ष समितीचा गुरुवारी आजरा येथील संभाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन होणार असल्याची पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
यावेळी कॉम्रेड संपत देसाई बोलताना म्हणाले वन विभागाकडे आम्ही वेळोवेळी मागणी केली कारण वन्यप्राणी संघर्ष संपणार विषय नाही यावर अभ्यास गट तयार करून समिती नेमावी. तर वन जमिनी बाबत काहीही माहित नाही. व सत्ताधारी आहेत.
म्हणून बैठक करता सत्ताधारी पेक्षा जनता महत्त्वाची आहे. वन विभागाला सरळ केल्याशिवाय शांत बसणार नाही.

अन्यथा वन्य प्राण्यांमुळे नुकसान होणाऱ्या बाधित जमिनी तुम्ही करायला घ्या व आम्हा शेतकऱ्यांना तुम्ही योग्य अशी नुकसान भरपाई द्यावी. किंवा एफआरपीप्रमाणे दर द्यावा. वन्य प्राण्यांपासून नुकसान होऊन शिल्लक राहिलेले धान्य तुमच्या कार्यालयात जमा करतो. तसा काही निर्णय घ्यावा.

व पालकमंत्री यांनी सत्ताधारी म्हणून काम करणार की जनतेसाठी हे ठरवावे
पण आपण बैठक घेत असताना सर्व जनतेला सामावून घेऊन बैठक घेतली नसल्याने ही बैठक घेण्यासाठी सदर ठिय्या आंदोलन असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
या बैठकीत शिवसेना ता. प्रमुख युवराज पोवार, कॉम्रेड शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, संजय तर्डेकर, प्रकाश मोरस्कर, संजय घाटगे, तसेच राजू कोलम, संजय सावंत, रवींद्र भाटले, संभाजी डोंगरे, सह महाविकास आघाडी व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.