Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा साखरचे - कमी केलेल्या सभासदांना समाविष्ट करण्याची उबाठा शिवसेनेची मागणी🛑शक्तीपीठ मार्गाच्या...

आजरा साखरचे – कमी केलेल्या सभासदांना समाविष्ट करण्याची उबाठा शिवसेनेची मागणी🛑शक्तीपीठ मार्गाच्या मूळ आजरा, कोल्हापूर अलाईनमेंटप्रमाणेच रस्ता करावा.- आजऱ्यातील शक्तिपीठ समर्थकांचे तहसीलदार यांना निवेदन.🟣मडिलगेत विविध उपक्रमानिमित्त वृक्षारोपण.🟣वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीत संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करावा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

🛑आजरा साखरचे – कमी केलेल्या सभासदांना समाविष्ट करण्याची उबाठा शिवसेनेची मागणी
🛑शक्तीपीठ मार्गाच्या मूळ आजरा, कोल्हापूर अलाईनमेंटप्रमाणेच रस्ता करावा.- आजऱ्यातील शक्तिपीठ समर्थकांचे तहसीलदार यांना निवेदन.
🟣मडिलगेत विविध उपक्रमानिमित्त वृक्षारोपण.
🟣वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीत संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करावा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

🛑आजरा साखरचे – कमी केलेल्या सभासदांना समाविष्ट करण्याची उबाठा शिवसेनेची मागणी

आजरा :- प्रतिनिधी

आजरा कारखाना प्रशासनाने कमी केलेल्या २७०० सभासदांना पुन्हा सभासद म्हणून समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने (ठाकरे गट) यांनी केली आहे. याची कार्यवाही न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे.

आजरा कारखान्याकडे २७०० सभासद तत्कालीन संचालक मंडळाने मंजूर केलेले होते. या सभासदांनी २०१६ च्या निवडणुकीत मतदानही केले होते. यानंतर काही संचालकांनी त्यावर तक्रार केल्यानंतर त्यांना मतदार यादीमध्ये समाविष्ट न करता त्यांनी भरलेली रक्कम कारखान्याने अनामत म्हणून ठेवली आहे. या सर्व सभासदांना कारखान्याने सभासद त्यांचे सभासदत्व रद्द करताना कोणतीही नोटीस बजावलेली नाही. यामध्ये काही सभासद मागासवर्गीय आहेत. त्यांची सभासद रक्कम शासनाने कारखान्याकडून सभासद प्रमाणपत्र

घेऊनच जमा केलेली आहे; पण त्या सभासदांनासुद्धा मतदार यादीत समाविष्ट केलेले नाही. या सर्व सभासदांवर कारखान्याने अन्याय केलेला आहे. या २७०० सभासदांनी भरलेली रक्कम ही कोटीत आहे. गेली अनेक वर्षे ही रक्कम कारखान्याने वापरली आहे. कारखान्याकडून आजपर्यंत कोणताही लाभ त्यांना दिलेला नाही. या सभासदांना येत्या १५ दिवसांत कारखाना संचालक मंडळाने या सर्व सभासदांना मतदारयादीत समाविष्ट करावे, अथवा भरलेली रक्कम व्याजासहीत परत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर कार्यवाही न झाल्यास सभासदांना घेऊन कारखान्यावर मोर्चा काढण्याचा इशाराही या निवेदनात दिला आहे. निवेदनावर तालुकाप्रमुख युवराज पोवार, ता.उपप्रमुख शिवाजी आढाव, विभाग प्रमुख दिनेश कांबळे, सुयश पाटील, अमित गुरव यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

🛑शक्तीपीठ मार्गाच्या मूळ आजरा, कोल्हापूर अलाईनमेंटप्रमाणेच रस्ता करावा.- आजऱ्यातील शक्तिपीठ समर्थकांचे तहसीलदार यांना निवेदन.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुका मार्गे जाणारा शक्तिपीठ मार्गाचा मार्ग बदलाच्या हालचाली याबाबत काही समर्थकांनी मूळ धरलेला मार्गाने हा रस्ता जावा अशा आशयाचे निवेदन घरात तहसीलदार यांना दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शक्तीपिठासाठी प्रस्तावित रस्ता मूळ आजरा कोल्हापूर मार्गे जाण्याचे नियोजन करण्यात आल होते. या नियोजनावर अनेक महिने चर्चा होऊन स्थानिक ग्रामस्थ शेतकरी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी सविस्तर संवाद साधण्यात आला होता. या कालावधात स्थानिक शेतकरी यांचा विश्वास संपादन केला. असून त्यांनी या मार्यास सहमती दर्शवली आहे.

मात्र अलीकडे समजते कि सदर रस्ता आता चंदगड मार्गे नेण्याचा विचार सुरु आहे. जो पूर्णपणे नवीन आणि अचानक घेतलेला निर्णय आहे. अशा प्रकार मार्गात बदल केल्याम. गेल्या वर्षभराच्या प्रयत्नांना व शेतकऱ्यांच्या विश्वासाला धक्का नसेल तसेच विकासकामात अनावश्यक विलंब होईल

म्हणून आम्ही आपल्याव कडे विनम्र विनंती करतो कि शक्तीपिठाचा रस्ता मूळ आजरा काल्ललापर अलाईनमेंटप्रमाणेच ठेवावा. जेणेकरून स्थानिक जनतेचा विश्वास अबाधित राहील आणि विकासकाम सुयोग्यांरत्या पार पडेल.
असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर श्रावण वाजे, प्रकाश कविटकर, लक्ष्मण कविटकर, रघुनाथ कविटकर, सुरेश राणे, प्रशांत सावंत, विश्वास तांबेकर सह शेतकरी समर्थकांच्या सहृया आहेत.

🟣मडिलगेत विविध उपक्रमानिमित्त वृक्षारोपण.

आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे ता. आजरा येथील सरपंच मित्रमंडळी, आधार ग्रुप व जगदंब बॉईज त्यांच्या वतीने दि. २८ रोजी गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
सरपंच बापू निऊगरे यांच्या नेतृत्वाखाली व सरपंच ग्रामरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सदर वृक्षारोपण मित्रपरिवार व विविध मंडळांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी मित्रपरिवारसह ग्रामस्थ उपस्थित होते.

🟣वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीत संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करावा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर – प्रतिनिधी

एका भागात वारंवार हत्ती किंवा इतर वन्यप्राणी येऊन त्याच शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यास त्या संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करून भरपाई निश्चित करावी. जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे होत असलेल्या सततच्या शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

आजरा तालुक्यातील आणि आसपासच्या गावांमध्ये हत्तींसह इतर वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी पालकमंत्री आबिटकर यांना निवेदन देत भरपाई मिळावी आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, संबंधित आरएफओ तसेच प्रभावित गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी विशेष बाब म्हणून याबाबत पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना योग्य प्रकारे भरपाई देण्याबाबत कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, शासनाने याबाबत स्प्ष्ट शासन निर्णयाद्वारे मदत देण्यासाठी नियम केले आहेत. त्यानुसार योग्य पद्धतीने करावेत. पंचनामे केवळ एकदाच न करता वास्तविक नुकसानाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे. तसेच, वन्यप्राणी दिसल्यानंतर त्वरित संरक्षण दल घटनास्थळी पोहोचेल, यासाठी यंत्रणा तत्पर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एकाच भागात वारंवार प्राणींची हालचाल होत असल्यास त्यांना अन्य भागात हलविण्याचे प्रयत्न करावेत, अशीही सूचना वन विभागाला करण्यात आली. याशिवाय, वन्यप्राण्यांमुळे वाहनांचे झालेले नुकसानही मदतीच्या कक्षेत आणावे, असे निर्देशही पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी दिले.

या बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी नागरिकांना सहकार्य न करणाऱ्या तसेच पंचनामे वेळेत न झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिले. येत्या आठ दिवसांत वनहक्क दावे मार्गी लावण्यासाठी तालुक्यात वन विभाग, महसूल विभाग व ग्रामस्त यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न तातडीने सोडवले जाणार आहेत. तसेच तेथील जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनेसाठी वन विभागाने तातडीने मंजुरी द्यावी अशाही सूचना त्यांनी वन विभागाला दिल्या. वन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या गैस कनेक्शन आणि सुरक्षा जाळी योजनेच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.