Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रअतिवृष्टी बाधित जाहीर केला.- पंचनामे कधी.- अतिवृष्टीमुळे मिळणाऱ्या सवलतीला लाभार्थी वंचित राहू...

अतिवृष्टी बाधित जाहीर केला.- पंचनामे कधी.- अतिवृष्टीमुळे मिळणाऱ्या सवलतीला लाभार्थी वंचित राहू नये.- श्रमिक मुक्ती दल

अतिवृष्टी बाधित जाहीर केला.- पंचनामे कधी.- अतिवृष्टीमुळे मिळणाऱ्या सवलतीला लाभार्थी वंचित राहू नये.- श्रमिक मुक्ती दल

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुका अतिवृष्टी बाधित जाहीर केला असला तरी पिकांचे पंचनामे न झाल्याने नुकसानभरपाई व अतिवृष्टीमुळे मिळणाऱ्या सवलतीसाठी इथला शेतकरी वंचित राहू नये यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागासह संबंधित सर्व यंत्रणेला द्याव्यात. असे निवेदन सोमवार दि.‌२७ रोजी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तहसीलदार आजरा यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आजऱ्यासह जिल्ह्यातील आठ तालुके अतिवृष्टी बाधित म्हणून जाहीर केले आहेत. पण पिकांचे पंचनामे न झाल्याने तालुक्यतील शेतकरी मिळणाऱ्या सवळतीपासून वंचित शकतो.

अतिवृष्टी बाधित ज क्षेत्रात मिळणाऱ्या खालील सवलती मिळाव्यात अशीही मागणी निवेदनातून केली आहे.
१- अतिवृष्टीमुळे पिकांचे ३३ टक्के अधिक नुकसान झालाने तालुक्यातील सर्वच शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतीकर्ज शंभर टक्के माफ करण्यात यावे.

२. पिकांचे पंचनामे करून पिक नुकसान भरपाई तातडीने मिळावी

३- महसूल व इतर विभागाकडून वसूल केली जाणारे कर यावर्षी रद्द करावी (घरगुती वीज बील, शेती पंपाचे वीज बिल, पाणीपट्टी इत्यादी)

४- महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत नवीन कामे गावोगावी सुरू करण्यात यावीत.
वरील सवलती मिळायच्या असतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे होणे गरजेचे आहे.

अशा आशयाचे निवेदन श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कॉ संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, बाळू जाधव, मारुती पाटील,व्ही-डी. जाधव दशरथ घुरे, युवराज जाधव, भीमराव माधव, अशोक मालव तहसीलदार आजरा याना आज दिले आहे. पंचनामे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.