जरशी गाईचे दुःखद निधन.- साडी चोळी – ओवाळणी करून केला अंत्यविधी. ( मडिलगे आजरा येथे आठ दिवसांपूर्वी एका गाईचे डोहाळ /आज दुसऱ्या गाईचा अटॅकने मृत्यू – कुटुंब दुःखात.)
आजरा.- प्रतिनिधी.

मुखप्राण्यावर जीवापाड प्रेम करण्याची भारतीय संस्कृती आहे. यामध्ये गाई सारख्या प्राण्यावर आपण भक्ती भावाने पाहतो. मडिलगे ता. आजरा येथील आनंद घाटगे यांनी व्यवसाय म्हणून नाहीतर श्रद्धेने एक गावठी गाय व एक जरशी गाय अशा दोन गाई घरी पाळल्या आहेत.
मनुष्य प्रमाणे तिच्या खाण्या पिण्याची व्यवस्था वेळेवर केली जात असंत.
या गाईंची देखभाल अगदी आपल्या मुलाप्रमाणे केली जाते. गाईंना पाहण्यासाठी नियमित पशुवैद्यकीय डॉक्टर भेट देत आरोग्याची काळजी घेत असत.
याच गोट्यातील
यामधील आठ दिवसापूर्वी गावठी गाय या गाईचे डोहाळचा कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा करण्यात आला होता.

आज. रविवार २६ रोजी पहाटे या जरशी गाईचे निधन झाले. परंतु संपूर्ण विधी भारतीय संस्कृती प्रमाणे करण्यात आला. यामध्ये गाईला साडी चोळी देऊन महिलांनी औक्षण केले. दफन करून त्या ठिकाणी आठवणीसाठी वृक्ष लावण्यात आले.
घाटगे कुटुंब या गाईवर जीवापाड प्रेम करत होते.
वासरू असल्येपासून सांभाळ केल्याने त्या गाईवर सर्वांचा जीव होता. दीड वर्षांच्या या गाईचा मृत्यू झाला.
यावेळी दुःखातून सावरत आनंद घाटगे, सौ. मायावती घाटगे यांनी ही गाय म्हणजे आमच्या कुटुंबातील एक सदस्या होती अशी भावना व्यक्त केली.
गाय हा मुखप्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. गाय या प्राण्याची हिंदू धर्मामध्ये पूजा केली जाते. तसेच गाईला हिंदू धर्मामध्ये उच्च स्थान आहे.
गाईचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे. श्रीकृष्ण यांना गाय अतिशय प्रिय होती. त्यामुळे गायीची पूजा हे अनंत कालापासून चालत आलेली आहे.
या अंत्यविधी व श्रद्धांजली वाहण्यासाठी ज्ञानदेव ढोकरे, पशुवैद्यकीय डॉ धोंडीबा कडगावकर, डॉ. दीपक केसरकर, डॉ भावेश शिवाजी पाटील.

तसेच सुरेश ढोकरे, बाबुराव घाटगे, बबन कातकर, संभाजी डोंगरे, दत्तात्रय डोंगरे, महादेव सावरतकर, अमोल ढोकरे, गंगाराम आयवाळे, मारुती राठोड, साहिल राठोड, मारुती हरळकर, शिवाजी येसणे, संभाजी शिवाजी घाटगे, रवींद्र येसरे, सौ मायावती घाटगे, विमल येसरे, मंगल शिवाजी ढोकरे, जयश्री निवृत्ती येसणे, पूजा सुतार, नंदिनी सुतार, कमल महादेव सुतार ग्रामस्थ उपस्थित होते.

