Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्र“खड्ड्यात उमटलेलं कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रतिबिंब…!” -सत्य कडू असतं.- एक कोल्हापूरकराचा आक्रोश.. पहा.👇...

“खड्ड्यात उमटलेलं कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रतिबिंब…!” -सत्य कडू असतं.- एक कोल्हापूरकराचा आक्रोश.. पहा.👇 व्यथा कोल्हापूरकरांची.

“खड्ड्यात उमटलेलं कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रतिबिंब…!” –
सत्य कडू असतं.- एक कोल्हापूरकराचा आक्रोश.. पहा.👇

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

पावसाचे दोन थेंब काय पडले, की कोल्हापूरच्या रस्त्यांचं आणि प्रशासनाचं ‘चेहरं’ दोन्ही धुवून निघालं! व खरा चेहरा समोर आला. निसर्गाची ही कमाल असते. महानगरपालिकेच्या भव्य वास्तूच्या समोरच पडलेला तो खड्डा फक्त एक खड्डा नाही, तर कोल्हापूरच्या ‘खड्डेवजा प्रशासनाचा’ आरसा आहे!

तया खड्ड्यात साचलेल्या पाण्यात जेव्हा कोल्हापूर महानगरपालिकेचं प्रतिबिंब उमटलं
तेव्हा वाटलं, या शहराच्या नशिबात आता फक्त ‘प्रतिबिंबातली पालिका’च उरलीये.
कारण खरी पालिका तर कुठे गायब झालीय, ती कागदोपत्री योजनांमध्ये, टक्केवारीच्या वाट्यात आणि निविदांच्या थरात गाडली गेलीये!

रस्ते म्हणे ‘स्मार्ट सिटी’ योजनेत बसवलेत — पण प्रत्यक्षात नागरिकांच्या मणक्यात बसणारे खड्डे दिवसेंदिवस खोल होत आहेत. आता कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकीय यंत्रणेने मनक्याच्या डॉक्टरची व्यवस्था करावी अशी स्तुती त्यांची करावी लागेल.

रिक्षात बसून कोल्हापूरच्या रस्त्यांवरून प्रवास करणं म्हणजे आता ‘एडव्हेंचर स्पोर्ट्स’ झालंय..
आणि पावसाळ्यात तर प्रत्येक गल्ली एक ‘मिनी तळं’ बनते — त्याचं उद्घाटन मात्र कोणी करत नाही!

महानगरपालिकेच्या गेटसमोरच जेव्हा खड्डा जन्म घेतो.. तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी आरशात स्वतःचा चेहरा बघावा.
कारण तोच त्यांच्या कारभाराचा ‘जिवंत फोटो’ आहे!
कधी काळी जनतेची सेवा करण्याचं व्रत घेतलेल्या या संस्थेला आज जनतेच्या त्रासाची काहीही लाज उरलेली नाही. जनतेचं आयुष्य रोज धोक्यात, पण प्रशासन मात्र मीटिंगच्या एसी खोल्यांत गार झोपलंय.

प्रश्न असा आहे महानगरपालिका समोरचा रस्ता डांबरी आहे की डांबरावरचं भ्रष्टाचाराचं आवरण आहे? खड्डे रस्त्यांवर आहेत की तुमच्या मनात?
तुम्ही जनतेची सेवा करता की फक्त निविदांची?

कोल्हापूरच्या नागरिकांनी तुम्हाला खुर्च्या दिल्या, विश्वास दिला — पणबदल्यात तुम्ही दिलं काय? खड्डे, चिखल, वाहतूक कोंडी आणि तोंडावर हसणारी बेफिकीरी!

त्या खड्ड्यात पाण्याचं प्रतिबिंब नाही.. तर हजारो कोल्हापुरकरांच्या न बोललेल्या हंबरण्याचं प्रतिबिंब आहे.
महानगरपालिकेच्या दाराशीच जर अशी दुर्दशा असेल.. तर बाकी शहरात जनतेची अवस्था काय असेल, याची कल्पना आली तरी अंगावर शहारे येतात.
आज त्या खड्ड्याने आपल्याला आरसा दाखवला आहे.
की प्रशासन झोपलंय, पण जनता अजून जागी आहे!

आता प्रश्न एवढाच आहे — त्या खड्ड्यातील प्रतिबिंब बघूनही जर महानगरपालिका हलली नाही..तर पुढच्या वेळी त्या प्रतिबिंबात जनतेचा रोष आणि संतापच उमटेल…!!!

सौजन्य :- कोल्हापूरचा सच्चा पुत्र सुनील सामंत संस्थापक अध्यक्ष शिवशाही फाऊंडेशन कोल्हापूर 9130395006

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.