Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा साखर कारखान्याने उसाचे उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजेत.- ना. हसन मुश्रीफ(...

आजरा साखर कारखान्याने उसाचे उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजेत.- ना. हसन मुश्रीफ( आजरा साखर गळीत हंगाम शुभारंभ पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न.)🟣अथर्व दौलत साखर कामगारांचे – आजरा तहसील कार्यालय समोर धरणे – आंदोलन.- पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन

🛑आजरा साखर कारखान्याने उसाचे उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजेत.- ना. हसन मुश्रीफ
( आजरा साखर गळीत हंगाम शुभारंभ पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न.)
🟣अथर्व दौलत साखर कामगारांचे – आजरा तहसील कार्यालय समोर धरणे – आंदोलन.- पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन

🟣आजरा साखर कारखान्याने उसाचे उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजेत.- ना. हसन मुश्रीफ
( आजरा साखर गळीत हंगाम शुभारंभ पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील वसंतराव देसाई साखर कारखाना संचालक मंडळ व व्यवस्थापनाने फक्त ऊस गाळपा सह ऊस उत्पादनात वाढ व्हावी. याकडेही लक्ष दिले पाहिजे. फक्त शंभर दिवसांचा गळीत हंगाम राहिला तर फायद्यात येणार नाही. इको सेन्सिटिव्ह झोनमुळे अन्य व्यवसाय करता येत नाहीत. यासाठी उसाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न केला तरच कारखाना नफ्यात येईल. यासाठी कारखान्याने १०० एकर जमीन घेऊन स्वतःच्या उसाची लागण करून उत्पादन घेतले पाहिजेत. सीएनजी सोलर प्रकल्प केल्यास यासाठी कोल्हापूर जिल्हा बँक आर्थिक मदत करेल सद्यस्थितीत जिल्हा बँकेने १२२ कोटी सात वर्षासाठी कर्ज दिले आहे. यापुढेही मदत केली जाईल.
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ऊसाला प्रती टन ४३०० शे दे करावे इथेलॉणचे दर वाढवावे.
आपल्या मागणीप्रमाणे आजरा एमआयडीसी जवळील टोल चालू होणार नाही. असे बोलताना ना. श्री. मुश्रीफ म्हणाले.

गळीत हंगाम शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना प्रकाश आबिटकर म्हणाले सहकारातील समृद्ध तालुका म्हणजे आजरा तालुका आहे. या तालुक्यात निवडणुकीपर्यंत राजकारण असते यानंतर सर्व राजकीय नेते विकासासाठी काम करतात हे अत्यंत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपल्या कारखान्याच्या विविध अडचणीसाठी सहकार्य करू आपल्या ऊस पिकासह अन्य पिकासाठी वन्य प्राण्याकडून होत असलेला त्रास यापूर्वी सातत्याने प्रयत्न करत असलेला हत्ती संगोपन केंद्राचा प्रश्न गावकऱ्यांची संमती असेल तर मार्ग आपल्या संमतीने तोही प्रश्न मार्गी काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.


याबाबत आजरा तालुक्याने हाती घेतलेले टोल नाकाच्या आंदोलन याबाबत हा टोल नाका घाटकरवाडी गावच्या पुढे गेल्यास आम्हाला हरकत नाही. अशी मागणी करूया. व हा टोल नका आजर्‍यातून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करूया
राज्यात कारखानदारी अडचणीत आली आहे. तीन महिने कारखानदारी करायची व नऊ महिने पगार द्यायचा.

यासाठी ऊस उत्पादनात वाढ होऊन पाच लाखापर्यंत क्रशिंग होत नाही. तोपर्यंत कारखान्याला फायदा होणार नाही. आजरा साखर कारखाना स्थापन झाला. त्यावेळी इकोझोन नव्हता. याबाबत आवाज उठवला पाहिजे व सुप्रीम कोर्टात न्याय मागूया परंतु उपपदार्थ चालू केल्याशिवाय कारखाना फायद्यात येणार नाही. आपल्या येणाऱ्या अडचणीसाठी आम्ही आपल्या सोबत असल्याचे पालकमंत्री नाम. श्री आबिटकर यांनी बोलताना म्हणाले.

यावेळी जिल्हा बँकेचे व आजरा साखरचे संचालक सुधीर देसाई म्हणाले. कारखाना अडचण असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे सह काही नेत्यांच्या कडे गेलो पण नाम. मुश्रीफ साहेब धावून आले. यापुढेही जिल्हा बँक मदत करेल आपल्या कारखान्याला पाच लाख क्रशिंग झाल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी सर्व ऊस उत्पादकांनी व सभासदाने आपला ऊस आजरा कारखान्याला घालावा. सोबत तालुक्यातील काही प्रश्न आहेत.‌ याकडे मंत्री महोदयांनी लक्ष द्यावे. पूर्वी आजरा तालुक्यात तीन जिल्हा परिषद होत्या व सहा पंचायत समिती यामध्ये एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती कमी केले आहेत. परंतु कमी केलेल्या जागा स्वीकृत करण्यात येणार असल्याचे समजते यामध्ये आजरा तालुक्याचा समावेश करावा.

वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतीकाचे नुकसान होत आहे. व आजरा तालुक्यावर बसलेले टोलचे भूत कायमची हद्दपार करावे असे बोलताना के. डी. सी संचालक श्री देसाई म्हणाले.

स्वागत व प्रास्ताविक करताना चेअरमन मुकुंददादा देसाई म्हणाले गणित हंगाम सुरू करत असताना अनेक अडचणी आहेत इकोझोन मध्ये कारखाना असल्यामुळे केवळ ऊस उत्पादन करून उसाचे गाळप करून तेवढ्या वरतीच काम चालू आहे. भविष्यात हा प्रश्न निकाली काढण्यासाठी मंत्री महोदयांनी पालकत्व घेतले आहे. यासाठी वन्यप्राणी, टोलमुक्ती, अन्य प्रोजेक्ट होण्यासाठी प्रयत्न व्हावा. व हत्ती संगोपन केंद्र व्हावे. अशा काही मागण्या चेअरमन श्री देसाई यांच्याकडून वतीने करण्यात आल्या. तसेच चालू गळीत हंगामा करिता तालुक्यातील सर्व सभासद व ऊस उत्पादकांनी कारखाना अडचणीत असल्यामुळे आपला सर्व ऊस आजरा साखर कारखान्याला घालावा.

असे आवाहन करण्यात आले.
यावेळी आजरा साखरेचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई, कार्यकारी संचालक सर्व संचालक, अधिकारी वर्ग, सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार संचालक काशिनाथ तेली यांनी मानले.

🟣अथर्व दौलत साखर कामगारांचे – आजरा तहसील कार्यालय समोर धरणे – आंदोलन.- पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन

आजरा.- प्रतिनिधी.

अथर्व दौलत शेतकरी सह. साखर कामगारांचे – आजरा तहसीलदार कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबत विविध मागणीचे निवेदन पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्याशी मागण्याबाबत चर्चा करण्यात आली.

अथर्व इंटरट्रेड प्रा. लि., लिज्ड युनीट दौलत शेतकरी सह. साखर कारखाना, हलकर्णी मधील साखर कामगारांच्या विविध प्रलंबीत न्याय मागण्याबाबत अथर्व प्रशासनास गेल्या १० महिन्यात वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे.

परंतु त्यांनी त्या संदर्भात युनियन बरोबर मिटींग अथवा प्रत्यक्ष चर्चा केलेली नाही. या संदर्भात आपणास तसेच अन्य संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांनाही युनियनच्या वतीने झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती सादर केल्या होत्या. कामगारांच्या न्याय प्रश्नाबाबत निर्णय होत नसल्याने कामगारांच्या कुटुबियांच्या गंभीर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सन २०२५-२६ चा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कामगारांच्या मागण्यांबाबत निर्णय व्हावा अशी युनियनची आग्रहाची मागणी आहे. कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी आज आपल्या कार्यालया समोर सर्व कामगार १ दिवसाचे धरणे आंदोलन करत आहेत.

हे आंदोलन प्रशासनाच्या नकारात्मक व अडमुठ्या धोरणांमुळे करावे लागत आहे.
आपण अथर्व प्रशासन आणि युनियन पदाधिकारी तसेच अन्य संबंधीत शासकीय अधिकारी यांची आपल्या उपस्थितीत बैठक आयोजीत करून कामगारांच्या खालील नमुद न्याय मागण्याबाबत योग्य ते निर्णय त्वरीत घेणेत यावेत ही अग्रहाची विनंती.

यामधील विविध मागण्या.

१) सन २०१९ च्या त्रिपक्षीय वेतन करारातील वेतन श्रेणीनुसार सर्व कामगारांची त्यांच्या हुद्यानुसार वेतन निश्चिती करून ती १००% लागु करणेत यावी आणि OR त्याचा देय दिनांका पासुन मागील फरक अदा करणेत यावा. २) कामगारांना वाढत्या महागाई पासुन संरक्षण देण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने
वेळोवेळी जाहीर करण्यात येत असलेला महागाई भत्ता देणेत यावा. आज अखेर अशा महागाई भत्याची थकीत रक्कम कामगारांना अदा करणेत यावी.

३) हंगामी कामगारांना कायम करण्याचे आश्वासन अथर्व प्रशासनाने वेळोवेळी दिले आहे. त्याची तातडीने पुर्तता करून सर्व हंगामी कामगारांना कायम करून त्यांना कायम लाभ मिळावा. ४) कामगारांचा ओव्हर टाईमचा पगार ज्या त्या महिन्याच्या वैतनातुन अदा करणेत यावा. तसेच हंगामी कामगारांचा रिटेंशन अलीन्स नियमितपणे व वेळेवर देणेत यावा.

५) कामगारांचे वेतन दर महिन्याच्या १० तारखे पर्यंत अदा करणेत यावे. ७) कामगारांची लिज करारा मध्ये मान्य केलेली मागील देणी रू. ३० कोटी लिज कराराच्या तारखे पासुन १२% व्याजासह त्वरीत देणेत यावीत. ८) न्युट्रियंटस् काळातील कामगारांचा थकीत पगार त्वरीत देणेत यावा. न्युट्रियंटस् काळातील शिल्लक साखरेच्या विक्रीतुन आलेल्या रक्कमेतुन सदर थकीत पगाराची रक्कम देणेत यावी. ९) १६ कामगारांवर असलेल्या कोर्ट केसीस अथर्व प्रशासनाने दिलेल्या आश्वासना प्रमाणे मागे घेणेत याव्यात.

१०) सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांची सर्व कायदेशीर देणी निवृत्त होतानाच देण्यात यावीत. यापूर्वी निवृत्त झालेल्या कामगारांची थकीत देणी लवकरात लवलवकर देणेत यावीत.
११) कामगारांना त्यांच्या आर्थिक अडचणी प्रसंगी बँक कर्जासाठी अथर्व व्यवस्थापनाकडुन लागणारी आवश्यक ती कागदपत्रे देण्याची व्यवस्था करावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या धरणे आंदोलनात कॉ. प्रा. डॉ. सुभाष जाधव, काॅ. उदय नारकर, प्रदीप पवार, कॉ. आबासाहेब चौगुले अशोक गावडे निवृत्ती चौकर इकबाल मंदार प्रदीप पवार महादेव फाटक नारायण तेजम उत्तम निकम सुरेश पाटील दिलीप कदम सटूप्पा घोटणे, सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

चौकट.

हलकार्णी. ता. चंदगड येथील दौलत सहकारी साखर पालकमंत्र्यांना ना. प्रकाश आबिटकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सन २०१९ मध्ये हा कारखाना अथर्व इंटरट्रेड प्रा. लि.प्रा. लि. ने ३९ वर्षाच्या लीजवर घेतल्यापासून त्याचे प्रशासन कामगारांना सापत्नभावाने वागवत आहे. त्यांनी कामगारांची कित्येक कायदेशीर देणी देण्यास सतत नकार दिला आहे. गेली पाच वर्षे प्रशासनाने कामगारांच्या मान्यताप्राप्त युनियनशी कायदेशीर मार्गाने चचर्चा करुन सौहार्दपूर्ण वातावरण कामगारांचे प्रश्न सोडवावेत असे संघढ़नेकडून निवेदनाद्वारे कित्येकदा आवाहन केले आहे.

मात्र त्याला हे प्रशासन सततच नकारात्मक प्रतिसाद देत आले आहे. दौलत शेतकरी साखर कारखाना लि. हलकर्णी येथील सर्व कामगारांचे धरणे आंदोलन झाले त्यावेळी मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. १३/१०/२०२५ रोजी दुपारी ३ वाजता बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी साखर कामगारांच्या मागण्याबाबत सर्व संबंधित घटकांकडून अनुपालन केले जाते आहे.

याबाबत माहिती घेण्यासाठी मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना निर्देष दिले. आणि पुढील बैठक मंगळवार दि. २८/१०/२०२५ रोजी घेण्यात येईल असे सांगितले.

गत सहा सिजनमध्ये वेळोवेळी कारखांना सुरु होण्यापूर्वी कामगारांच्या प्रलंबित मागण्याबाबत दिलेलो आश्वासने अधर्व प्रशासनाने पाळलेली नाहीत. आज आम्ही आपणास साखर कामगार महिलांच्या वतीने हे निवेदन पेऊन चंदगड तालुक्यातील शेतकरी, साखर कामगार, ऊस तोडणी व वाहतुक कामगार यांच्या मागणीबाबत अथर्वचे प्रशासन कायदयाचे अनुपालन करत नाही. आम्ही आपणास अशी नंम्र विनंती करतो की, अथर्व प्रशासनाला, या प्रश्नी कायद्याचे पालन करण्याचे आदेश पालकमंत्री या नात्याने द्यावा. असे पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत तहसील कार्यालयाच्या दालनात आंदोलक व पालकमंत्री ना.श्री. आबिटकर यांच्या चर्चा झाली. यावेळी तहसीलदार समीर माने सह अधिकारी प्रमुख आंदोलन उपस्थित होते.

आंदोलनाबाबत दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.