आजरा . प्रतिनिधी. १८
आजरा येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वतीने दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी आपला भारत देश ७४ वर्षे पूर्ण करून ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
येणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद “Call For Tiranga” या अभियानांतर्गत देशभर राष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रम राबवणार आहेत.
यामध्ये राष्ट्रीय सण उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या साजरा करणे व इतर समाजोपयोगी उपक्रम राष्ट्रजागृती करता अभावीपकडून करत आहोत.
दि.१५ रोजी स. ११. वा. स्थानिक आजरा शहरात “श्री शिवतीर्थ आजरा” या ठिकाणी भारत माता प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रतिमा पूजन हे श्री.विजय बांदेकर यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमासाठी चे सामूहिक गीत अभाविप आजरा विद्यार्थिनी कार्यप्रमुख शीतल सरदेसाई यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभाविप आजरा शहर मंत्री श्वेताली तावडे यांनी केले आणि एकलव्य आयाम जिल्हाप्रमुख रूपराज घवाळे यांनी बौद्धिक विचार मांडले. यानंतर अभाविप पूर्व कार्यकर्ते कार्यकर्ते वामन सामंत सर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित राष्ट्रभक्त व मान्यवरांचे आभार अभिषेक रोडगी यांनी केले.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी व राष्ट्रभक्त नागरिक उपस्थित होते.
याचबरोबर आजरा तालुक्यातील देवकांडगाव, खानापूर, लाटगाव या गावांमध्ये सुद्धा भारत माता प्रतिमापूजन अभाविप आजरा कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. आजरा शहर व आजरा शहरातील ग्रामीण भागातील गावांमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
अभाविपद्वारे आपणा सर्वांना आवाहन करण्यात येते की वर्षभर अभाविप अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अनेक उपक्रम राबवणार असून यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे कसे अवाहन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभाविप आजरा शहर सहमंत्री सुप्रिया भुमकर यांनी केले
