【 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न.- डॉ.डी. वाय. पाटील महाविद्यालय तळसंदेची विद्यार्थिनी – तन्वी लकमले. 】
आजरा. प्रतिनिधी.
मडिलगे ता. आजरा येथील तन्वी विनोद लकमले या मुलीनं ग्रामीण ( कृषी ) जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव या अभियाना अंतर्गत
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न असलेले डॉ.डी वाय पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथील चतुर्थ वर्षात शिकणारी विद्यार्थीनी कु. तन्वी हिने ग्रामीण ( कृषी ) जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव या अभियाना अंतर्गत मडीलगे, ता.आजरा, जि.कोल्हापूर येथील शेतकऱ्यांना भुईमुग पिकासाठी रासायनिक व जिवाणू संवर्धनाचा वापर करून बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी करताना बिज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे कु. तन्वी हिने आवाहन केले.
भुईमुगाची उगवण क्षमता वाढावी, पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, हेक्टरी उत्पादन वाढीस मदत व्हावी यासाठी बियाण्यांवर प्रथम थायरम हे रासायनिक बुरशीनाशक ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी चोळावे, त्यानंतर भुईमुग गटाचे रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रत्येकी २५० ml प्रति १ किलो बियाण्यासाठी बीजप्रक्रिया करण्याची गरज असते.
शिवाय असे पीक बुरशीजन्य कीडरोगास लवकर बळी पडत नाहीत आणि बुरशीजन्य रोगांपासून सरंक्षण होते.
तसेच रायझोबियम जिवाणू मुळे नत्र स्थिरीकरण होऊन रासायनिक खतांची २५% बचत होते. व उत्पादनात भरघोस वाढ होते. त्यासाठी बीजप्रक्रिया ही अत्यावशक आहे. अशी माहिती यावेळी कु.तन्वी हिने दिली.
यासाठी त्याला डॉ डी वाय पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे चे प्राचार्य डी. एन. शेलार, ॲकॅडमिक इनचार्ज आर. आर. पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे, कार्यक्रम अधिकारी डॉ. ए.पी.पवार आणि विषयतज्ञ डॉ. के. एस. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
