आजरा. प्रतिनिधी.१८
शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे दि. २३ रोजी मोर्चा होणार असल्याचे माजी खासदार राजु शेट्टी आजरा येथे पत्रकार परिषेदेत बोलत होते.
प्रास्ताविक ता.अध्यक्ष तानाजी देसाई यांनी केले. स्वागत इंद्रजीत देसाई यांनी केले.
मा. खास. श्री. शेट्टी पुढे म्हणाले अलीकडे नद्यांना पूर येत आहेत. यामुळे शेतपिकांचे नुकसान प्रचंड होत आहे. फक्त पिकांचे नुकसान न होता. शेत वाहुन जात आहेत. यामुळे पंचनामे करताना फक्त पिकांचे पंचनामे न करता जमीनदोस्त झालेल्या शेतजमीनीची सरकट नुकसान भरपाई मिळावी, तसेच २०१९ च्या धर्तीवर पूरग्रस्त शेतकऱ्यांची विनाअट संपूर्ण कर्जमापी करावी, त्याच्या सोयीचे पुनवर्सन करावे, कृष्णा व पंचगंगा आदी नद्यांच्या मार्गावर असलेल्या पुलाचा भरावा कमी करून कमानी पूल बांधावा, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फि माफ करावी, २००५- २०२१ पंर्यत ४ मोठे पूर आले आहेत. यामुळे अनेक संकटाचा सामना प्रशानला करावा लागला आहे या अनुषंगाने अभ्यासगट नेमुन अमंलबजावणी करावी, प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान प्रोत्साहनपर अनुदान जाहिर करून केलेले द्यावे.ज्या गावामध्ये पूराने पाणी गेले आहे. अशी गावे पूरग्रस्त गाव घोषित करुन सरसकट सानुग्रह अनुदान द्यावे या मागण्या घेऊन पूरग्रस्त शेतकऱ्यासाठी आक्रोश आंदोलन होणार असल्याचे श्री. शेट्टी यांनी सांगितले. तसेच शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यावार, निवृत्ती कांबळे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जयसिंगपूर नगरसेवक शैलेश चौगुले, तसेच आजरा येथील कृष्णा पाटील, सखाराम केसरकर, बाबुराव आडाव, सुरेश पाटील, श्रीपती गुरव, सह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते इंद्रजीत देसाई यांनी आभार मानले.
