आजरा. प्रतिनिधी.१६
आजरा हायस्कूल आजरा येथील कला शिक्षक तानाजी पाटील यांनी आपल्या कलेच्या फलक रेखाटनातून महापूराची सत्यता दि. १५ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपल्या हायस्कूलच्या फलकावर कला दर्शवली देशावर गेली दीड वर्षे कोरोनाचे महासंकट आपल्या देशावर ओढावले त्यातून सावरता सावरता अचानक जुलै महिन्याच्या अखेरीस महापुराच संकट अनेक कुटूंबांना उध्वस्त करून गेल . अनेकांच्या जीवनाचा खेळ खल्लास झाला . जीवनाची राखरांगोळी होण्यासाखं संकट कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोला, रायगड , अनेक भागातील कुटूंबांवर . आले. अनेक परिवार महापुरामुळे बेघर झाली अनेकांचा काडी काडी ने जोडलेला संसार डोळ्यादेखत दगड मातीत व पुरात वाहून गेला. अनेक मुक प्राणी व जिवंत माणसं ढिगाऱ्याखाली गाडली गेली . फक्त नि फक्त शिल्लक राहीले ते सुन्न करणारं दृश्य आणि हंबरडा फोडणारा टाहो . समजत असलेल्या घटना मन्न सुन्न करत होत्या. मिडियावर व्हायरल होणारे फोटो हे सर्वत्र चित्र विदारक होत .त्यातूनच महापूराची भीषणता व वास्तव चित्र दाखवण्याचा प्रयत्न आजरा हायस्कूल चे कलाशिक्षक श्री पाटील यांनी आपल्या रेखाटनातून केले आहे .
घरातील आई-बाबा देवाघरी गेले डोक्यावर छप्पर उध्वस्त झालं अशा अवस्थेत आपल्या आजोबा च्या खांद्यावर डोकं ठेवून धाय मोकलून रडणारी नात व हंबरडा फोडून रडणारा तिचा आजोबा हे वास्तव व मन्न निः शब्द करणार सगळ्यांच हृदय हेलावून टाकतं .
कोरोणाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण चालू आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे .म्हणून मला शाळेत जायचं हाय.- म्हणणारा मुलगा …अशी उभेउभ चित्ररेखाटने आपल्या फलक लेखनातून केली आहेत .
रंगीत खडू च्या माध्यमातून महापुराचे भीषण वास्तव उत्कटपणे मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे .फळाच्या एका बाजूला उध्वस्त झालेल्या कुटुंबांना धीर सोडू नको व खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने संसार उभे करा …तुझी देवाला नक्कीच काळजी आहे .असा संदेश आपल्या चित्रातून दिला आहे .यासाठी सर्वांनी एक हात मदतीचा पुढे केला पाहिजे .पूरग्रस्त बांधवांना सढळ हाताने मदत करा .असे आवाहन आजरा हायस्कूल ,तालुका आजरा ,जिल्हा .कोल्हापूर येथील कलाशिक्षक श्री पाटील यांनी आपल्या अप्रतिम रेखाटला द्वारे केले आहे. यासाठी त्यांना मुख्याध्यापक शिवाजी येसणे अध्यक्ष ‘ व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले .
