Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रउत्तुर जि. प. लढत चौरंगी होण्याची शक्यता.- तर उत्तुर व भादवण पं....

उत्तुर जि. प. लढत चौरंगी होण्याची शक्यता.- तर उत्तुर व भादवण पं. स. इच्छुकांची होणार गर्दी.- ( उमेदवार जोडण्याच्या लगबगीत.- )🛑पारेवाडीतील गणेश महिला दुध संस्थेमार्फत उत्पादकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूचे वाटपदुध वाढीसाठी प्रयत्नशिल :- संस्थापक अनिल नार्वेकर.

🛑उत्तुर जि. प. लढत चौरंगी होण्याची शक्यता.- तर उत्तुर व भादवण पं. स. इच्छुकांची होणार गर्दी.- ( उमेदवार जोडण्याच्या लगबगीत.- )
🛑पारेवाडीतील गणेश महिला दुध संस्थेमार्फत उत्पादकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूचे वाटप
दुध वाढीसाठी प्रयत्नशिल :- संस्थापक अनिल नार्वेकर.

🟣उत्तुर जि. प. चौरंगी होण्याची शक्यता.- तर उत्तुर व भादवण पं. स. इच्छुक होणार गर्दी.- उमेदवार जोडण्याच्या लगबगीत.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील तीन जिल्हा परिषद यापूर्वी होत्या यामध्ये एक जि. प. कमी करण्यात आली व जिल्हा परिषद पंचायत समितीची कालावधी संपून बऱ्याच कालावधीनंतर निवडणुका जाहीर झाल्या व यामध्ये एक जिल्हा परिषद कमी करून उर्वरित दोन्हीही मतदार संघ सर्वसाधारण आरक्षण पडले व यामुळे दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारांची चुरस वाढणार आहे.

तर पंचायत समिती मतदार संघातील सहापैकी दोन कमी केल्या त्यामुळे चार पंचायत समिती मतदारसंघात इच्छुकांची गर्दी होणार आहे. यामध्ये उत्तुर जिल्हा परिषद मध्ये एक नजर टाकली तर महाविकास आघाडी व सत्तेतील महायुती म्हणून लढत होतात की स्थानिक राजकीय नेत्यांच्या राजकीय युद्ध होतात हे पहावं लागणार आहे.

अजूनही राजकीय पक्षांनी आपली भूमिका गुलदस्ता ठेवली आहे. तरीही राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
या उत्तर जि. प. मतदारसंघात चौरंगी लढत होईल परंतु निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी अजूनही अंदाज बांधता राजकीय येत नाही. परंतु राजकारणात कोण कुणाचा शत्रू व कोण कोणाचा मित्र नसतो.

यामुळे राष्ट्रीय काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, भाजप, दोन्ही शिवसेना यांच्यासह अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात राहतील हे मात्र निश्चित. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. खुला प्रवर्गामुळे बंडखोरीची संख्या अधिक राहण्याची शक्यता असल्याने नेत्यांसमोर कसोटी लागणार आहे.

उत्तुर जिल्हा परिषद गटासह दोन्ही मतदार संघातील गावे वाढल्याने पूर्वीचा मतदारसंघ व होत असलेल्या गाठीभेटी लोकांची केलेली कामे यामध्ये काही कधीही संपर्क करण्यात आलेले मतदार असणार आहेत. गेल्यावेळी २२ गावे या मतदारसंघात होती. आता १२
गावांचा नव्याने समावेश झाला आहे. यामुळे प्रचार करताना उमेदवारांना पायाला भिंगरी बांधावी लागणार आहे.

मतदारसंष खुला झाल्याने उमेदवारांची हा मतदारसंघ खुला झाल्याने इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या उमेदवारांना रोखायचं कसं हा मोठा प्रश्न नेत्यांसमोर उपस्थित राहणार आहे. उत्तूर, भादवण, बहिरेवाडी, मडिलगे या मोठ्या मतदार संख्या असलेली गावे.‌ या ठिकाणी मते मिळवण्याची फिल्डिंग नेहमीच लागते. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत
उमेश आपटे (कांग्रेस)
वसंतराव धुरे (राष्ट्रवादी)
मारुती घोरपडे (ताराराणी) असे उमेदवार होते. यामध्ये
श्री. आपटे यांनी विजय मिळला होता.

आपटे यापूर्वी दोन वेळा निवडून आले. २०१४ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते एकवेळ जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले त्यांनी पंचायत समिती सभापती व दोन वेळा साखर कारखान्यात संधी मिळाली. या मादारसंघात ३४ गावांचा समावेश राहणार आहे. बहिरेवाडीपासून हा मतदारसंघ आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीतही ही युती कायम राहावी, असा दवाव कार्यकत्यांचा आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक व गोकुळ या दोन्ही संस्थांच्या सत्तेत प्रत्येक पक्षाचा एक प्रमुख आहेच. हा राजकीय खेळ जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने खेळण्याची शक्यता असू शकते परंतु दरम्यान, गोकुळाचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे गटाने गत निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवली होती.

उत्तूर गटामधून काँग्रेसकडून उमेश आपटे तर राष्ट्रवादी (अजित पवार) वतीने वसंतराव धुरे पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर राष्ट्रवादीचे ( शरद पवार गट) उमेदवार म्हणून विठ्ठल उतुरकर यांचा नवीन चेहरा आल्यास नवल वाटू नये. दुसरीकडे प्रकाश चव्हाण, शिंदे शिवसेनेचे संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिवाथ तेली, माजी उपसभापती दीपक देसाई, राष्ट्रवादी युवक संजय येजरे, तर ओबीसी आरक्षणातून पंचायत समिती सभापती निवड असल्याने भादवण पंचायत समिती मतदार संघातून सुरस वाढणार आहे.

यामध्ये भादवण पं. स. मधुन अनेक वेळा मडिलगेतुन पंचायत समिती उमेदवार विजयी झाला आहे. आता ही परंपरा कायम राहणार की यामध्ये बदल होणार परंतु हा विजय रोखण्यासाठी भादवण मधून एक नौका उमेदवार समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

अद्याप उमेदवाराचे नाव गुलदस्त आहे.‌ परंतु मडिलगे गावातील नाम. मंत्री हसन मुश्रीफ यांची अधिक जवळीक आहे. त्यामुळे कदाचित राष्ट्रवादी अजित गटाचा
उमेदवार भादवण पंचायत समितीसाठी या गावातून होऊ शकतो. तर उत्तुर जि. प. साठी वसंतराव धुरे व पंचायत समितीसाठी माजी उपसभापती शिरीष देसाई अशी नावे पुढे येऊ शकतात महाविकास आघाडी नाही झाल्यास.‌ महाविकास आघाडी व महायुती यांच्या युती न होता वेगळ्या चुली मांडल्यास अपक्षांसह उमेदवारांची मोठी गर्दी होणार आहे.

🛑पारेवाडीतील गणेश महिला दुध संस्थेमार्फत उत्पादकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूचे वाटप
दुध वाढीसाठी प्रयत्नशिल :- संस्थापक अनिल नार्वेकर.

आजरा : प्रतिनिधी.

पारेवाडी (ता. आजरा) येथील गणेश महिला दुध संस्थेच्यावतीने दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त बोनस म्हणून भेटवस्तू व रोख रक्कम देण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अनिल नार्वेकर होते.

स्वागत चेअरमन सौ. उज्वला अनिल नार्वेकर यांनी केले. संस्थापक नार्वेकर म्हणाले, सध्या खासगी दुध संस्थेनी शिरकाव केल्यामुळे सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. परिणामी दुध संस्था संकलनामध्ये घट होत आहे.

सध्याच्या काळात सहकारी दूध संस्था टीकविण्याकरिता दुध उत्पादकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. याकरिता संचालक मंडळाच्या सभेत ठरल्याप्रमाणे यंदा दिवाळी बोनस म्हणून दुध उत्पादकांना गोकुळ संघ व संस्थेकडून आर्थिकस्वरूपात मदत केलीच आहे. याशिवाय प्रत्येक दुध उत्पादकाला वस्तू रूपात स्टील बकेटही देण्यात आले आहे.

याहीपुढे दुध वाढीसाठी संस्थेमार्फत विविध योजना राबवून प्रयत्न असणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अनिल नार्वेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी चेअरमन उज्वला नार्वेकर, व्हा. चेअरमन अर्चना निर्मळे, संचालक सुरेखा निर्मळे, रेखा निर्मळे, चैत्राली घेवडे, मालुतााई निकम, सोनाबाई रेडेकर यासह वर्षा निकम व उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सचिव अनिल निकम यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.