खोटे पुरावे जोडून मतदान दुसऱ्या वार्डात – मतदार व घरमालक यांचेवर फौजदारी दाखल करावी.- सुनील शिंदे
( आजरा नगरपंचायत मध्ये – मताचा सावळा गोंधळ )
आजरा.- प्रतिनिधी
खोटे पुरावे जोडून मतदान वेगळ्या वॉर्डमध्ये ट्रान्सफर केले असल्यास मतदार व घरमालक यांचेवर फौजदारी दाखल करावी. असे निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी यांना
सुनिल शिंदे आजरा त्यांनी दिले आहे निवेदनात म्हटले आहे.
आजरा शहरात महाजन गल्ली येथे माझे स्वमालकीच्या घरामध्ये राहत आहे. आजरा नगरपंचायतीची निवडणूक लागली असून नगराध्यक्ष व वॉर्ड आरक्षण सुद्धा जाहीर झाले आहे. पण राजकीय लोकांनी जर राहत घर एका वॉर्डमध्ये आणि डुप्लीकेट राहणारे ठिकाण दुसरे दाखवले असेल आणि त्यावर तक्रारी असतील तर आपण त्या मतदाराच्या चौकशीसाठी अधिकारी पाठवणार आहात त्यावेळेला ज्याने तक्रार केली त्याला सुद्धा हजर राहणेची लेखी कल्पना द्यावी. सदर चा पंचनामा तक्रारदार, मतदार व तो घरमालक यांचे समोर व्हावा. त्याला गल्लीतील काही साक्ष घ्याव्यात जर सर्व माहिती खोटी झाली तर त्या घरमालक व मतदारावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन. त्याचे मतदान तो कायमस्वरूपी ज्या घरात राहतो ते घर ज्या वॉर्डमध्ये आहे त्याठिकाणीच त्याला करणे भाग पाडावे. अन्यता ही ट्रान्सफर होणारी बोगस मते लोकशाहीचा गळा चिरत आहेत.
आपण एक नगरपंचायतचे सक्षम अधिकारी आहात. एक मतदार व भारतीय नागरीक म्हणून मी आपल्याकडे न्यायाची अपेक्षा करत आहे. मतदारांची मते एका वॉर्डतून दुसऱ्या वॉर्डात ट्रान्सफर करत असताना प्रत्येक वॉर्डातील मतदार संख्या सारखी किंवा समतोल राहीली पाहिजे. जर या मध्ये ९९ अंकांपेक्षा जास्त फरक असेल तर तो त्यावॉर्डावर किंवा त्या ठिकाणी उमेदवारी लढवणाऱ्या उमेदवारावर आपण अन्याय करत आहात. याची दक्षता घ्यावी. यापलीकडे आपलेकडून अन्याय झालेस तक्रारदारांच्याकडून त्याच्याकडील असलेले पुरावे घेऊन मा. निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचेकडे न्याय मागावा लागेल. तरी कृपया यामध्ये निरपेक्ष चौकशी करुन योग्य तो न्याय द्यावा. सुनील शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
