Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रवसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर- कारखान्यामार्फत शेतकरी मेळावा.- मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा....

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर- कारखान्यामार्फत शेतकरी मेळावा.- मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. आवाहन – चेअरमन मुकुंदराव देसाई

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर- कारखान्यामार्फत शेतकरी मेळावा.- मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. आवाहन – चेअरमन मुकुंदराव देसाई

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.अमृतनगर-गवसे च्या वतींने सर्व ऊस उत्पादक शेतक-यांना ऊस पीक व सरासरी एकरी ऊस उत्पादन वाढीबाबत माहिती देणेसाठी शुकवार दि.१० ऑक्टोंबर रोजी स. ११ वा. जनता सहकारी बँक लि. आजरा या बँकेच्या हॉलमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन कारखान्यामार्फत केले आहे.

सदर मेळाव्यात ऊस पीक वाढविणेसाठी टिश्यु कल्चर, सेंद्रीय व रासायनीक खतांचा वापर, ठिबक सिंचन इ. विषयावर कृषि विभागाचे सहसंचालक बसवराज भिमाप्पा मास्तोळी तसेच वसंतदादा शुगरचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलक, व शास्त्रज्ञ डॉ. कपिल विजयराव सुशीर व जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी जालींदर मुरलीधर पांगरे, नामदेव शिवाजी परीट, किरण जयसिंग पाटील, भुषण पंडीत पाटील व भारती ग्रीनटेक प्रा.लि.चे अधिकारी विनय भालचंद्र पोळ हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर शेतकरी मेळाव्यास ऊस उत्पादक शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी आवाहन केले आहे.
याबाबतची माहिती कार्यकारी संचालक एस.कै. सावंत यांनी दिली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.