Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रशिंदे सेनेने आजरा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेवर केलेल्या आरोपातील.- पदाधिकारी व कारखाना...

शिंदे सेनेने आजरा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेवर केलेल्या आरोपातील.- पदाधिकारी व कारखाना चेअरमन / व्यवस्थापन यांची गोपनीय बैठकीत चर्चा व स्पष्टीकरण.👇

शिंदे सेनेने आजरा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेवर केलेल्या आरोपातील.- पदाधिकारी व कारखाना चेअरमन / व्यवस्थापन यांची गोपनीय बैठकीत चर्चा व स्पष्टीकरण.👇

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील शिंदे सेनेने आजरा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेवर केलेल्या आरोपातील स्पष्टीकरण कारखाना व्यवस्थापन व चेअरमन यांचे सोबत आज दि.३ रोजी याबाबत चर्चा झाली. याबाबतची माहिती शिंदे सेनेच्या पदाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दि ५ रोजी माहिती दिली. कि यापूर्वी दि. २५/०९/२०२५ रोजी सेनेच्या पदाधिकारी यांनी आजरा साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात आजरा साखर कारखाना चेअरमन व संचालका सोबत दि.०३/१०/२०२५ रोजी आजरा विश्रामगृह मध्ये बैठक संपन्न झाली.

पत्रकार परिषदेत आरोप.- आरोपातील स्पष्टीकरण – माहिती गोपनीय बैठकीत ?.

बैठकीचा इतिवृत्तांत खालीलप्रमाणे. दि. २५ /०९ /२०२५ रोजी शिंदे शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ता. प्रमुख संजय पाटील यांनी कारखान्यात झालेली बेरिंग चोरी तसेच शेअर्स रक्कम कमी भरलेल्या सभासदांना सभासद करुन घेणे याबाबत विचारणा केली होती. तसेच माजी आत्मा कमीटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई यांनी आजरा कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा ही बोगस ताळेबंदावर आधारीत बोगस वार्षिक सभा असा आरोप करणेत आला. या आरोपाच्या स्पष्टीकर बाबत कारखाना व्यवस्थापन व चेअरमन त्यांनी सांगितले की, शेतक-यांचे साल २०१७/२०१८ व २०१८/२०१९ सालातील १२ कोटी २४ लाख देणे हे सन २०१९/२०२० पासुन देणे न दाखवता भागभांडवल अनामत व रिझर्व फंड कडे वळते करण्यात आले. तसेच जमीनीचे पुर्नः मुल्यांकन सन २०२३/२०२४ मध्ये जवळपास १५२ कोटींनी वाढवून २७ कोटी जमीनीचे व्हॅल्युएशन १८० कोटीपर्यंत नेण्यात आले, प्री-ऑपरेटिव्ह खर्च हे सन २०२१/२०२२ पासुन खर्चात न दाखवता मालमत्तेमध्ये २२ कोटी ३० लाख इतके दाखवण्यात आले, ते आता वाढवून सन २०२४/२०२५ मध्ये ३३ कोटी ४ लाख पर्यंत वाढवण्यात आले आहेत व त्यावर कोणत्याही प्रकारचा घसारा आकरण्यात येत नाही. साखर यंत्रसामग्रीत सन २०२४/२०२५ मध्ये जवळपास ७ कोटी ८४ लाखाची वाढ झालेली असुन सुद्धा एकुण गाळप क्षमतेत अपेक्षित वाढ झालेली नाही. हे सर्व पाहता कारखाना सन २०२४/२०२५ अखेर १२१ कोटी ७४ लाख तोट्यात नसून खरे पाहता तो अंदाजे ३२५ कोटी तोट्यात आहे. तसेच चालू वर्षी तो १ कोटी ४२ लाख नफ्यात नसून अंदाजे ३ कोटी ४० लाख तोट्यात असल्याचे दिसते. इतके असून सुद्धा संचालक मंडळाने चालू वर्षाअखेर ३ लाख २३ हजार २५० इतका बैठक भत्ता उचलला असून हि गोष्ट चिड आणणारी आहे. या सर्व मुद्यांच्या आधारावर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घातल असतानाच संचालक मंडळाने एक आठवड्यात खुलासा न केल्यास मध्यम मुदत कर्ज १२२ कोटी पुरवठा करणा-या NCDC तसेच साखर सहसंचालक व साखर आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले होते याची दखल घेऊन दि.०३/१०/२०२५ रोजी चेअरमन व संचालक मंडळासोबत शिवसेना पदाधिकारीका-यांची बैठक आजरा विश्रामगृहावर करण्यात आली. यावेळी वरील सर्व मुद्यांचा उहापोह करण्यात आला. यावेळी प्राथमिक स्वरुपात प्रमुख दोन मागण्यांबाबत ताक्ताळ निर्णय घेण्याबाबत संचालक मंडळाला सुचित करण्यात आले. त्या खालीलप्रमाणे –

शेतकरी देणे १२ कोटी २४ लाख सन २०१९/२०२० ताळेबंदाप्रमाणे वार्षिक अहवालात जसेच्या तसे दाखवणे व ते परत देण्याबाबत निश्चीत कार्यक्रम प्रसिद्ध करणे.

२) शेअर्स पोटी काही रक्कम भरुन घेतलेल्या शेतक-यांना सभासद करुन घेणे व टप्या-टप्याने उर्वरीत शेअर्स रक्कम पुर्ण करुन घेणे. ५ हजार आतील शेअर्स धारकांना दिवाळी पुर्वी साम्वर देणेत याची

या वरील प्रमुख दोन मागण्याबाबत संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घेऊन पत्रकारपरिषदेमध्ये याबाबत रितसर घोषणा करुन याचा अंमल तात्काळ करणेत यावा. अशी मागणी शिवसेना पदआधिकारा-यांकडून करण्यात आली असून इतर मागण्याबाबत चर्चा वरील मुद्यावर निर्णय झालेनंतर करण्यात येईल असे सांगण्यात आले.

असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून स्पष्टीकरण देण्यात आल्याची माहिती शिंदेसेनेच्या पदाधिकारी यांनी दिली आहे.

यावेळी आजरा कारखाना चेअरमन मुकंदराव देसाई, व्हा. चेअरमन सुभाष देसाई संचालक मधुकर देसाई, रणजित देसाई, अनिल फड्के तसेच कार्यकारी संचालक संभाजी सावंत चिफ अकाऊटंट, प्रकाश चव्हाण, डे. चिफ अकाऊटंट रमेश वांगणेकर आदी तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत, तालुका प्रमुख संजय पाटील, माजी आत्मा कमिटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई, आजरा शिवसेना शहर प्रमुख विजय थोरवत, संतोष भाटले, साळगाव सरपंच धनंजय पाटील, रणजीत सरदेसाई, दयानंद निऊंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.